Shukra Chandra Yuti in Kumbh: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक अंतराने राशी बदलतात आणि इतर ग्रहांशी युती करून शुभ योग तयार करतात, ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. ज्योतिषीय गणनेनुसार, आज, ९ मार्च २०२४, शनिवारी एक अतिशय शुभ ग्रह स्थिती निर्माण झाली आहे. शुक्र, ग्रह गोचर करुन आधीच शनीच्या कुंभ राशीत विराजमान आहे. तर आता मनाचा कारक चंद्राने देखील संक्रमण करून कुंभ राशीत प्रवेश केला आहे. त्यामुळे कुंभ राशीत शुक्र आणि चंद्राची युती निर्माण झाली आहे. शुक्र आणि चंद्राचा संयोग काही राशींसाठी खूप शुभ परिणाम देऊ शकतो. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. जीवनात सुख-सुविधा वाढू शकतात.
‘या’ राशींचे भाग्य चमकणार?
मेष राशी
तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. कमाईचे नवीन मार्ग सापडू शकतात. व्यावसायिकांना मोठा फायदा होऊ शकतो. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं मार्गी लागू शकतात. यावेळी तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो. धनलाभ होऊ शकतो. करिअरच्या बाबतीत या वेळी तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळू शकते. तुमची लोकप्रियता आणि आदर वाढू शकतो.
(हे ही वाचा: २ एप्रिलपासून ‘या’ राशींना होणार आर्थिक लाभ? बुधदेव वक्री होताच मिळू शकते नशिबाला कलाटणी)
कन्या राशी
या राशीच्या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. व्यवसायासाठी हा काळ प्रगती घेऊन येणारा ठरु शकतो. तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोतही निर्माण होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात.
तूळ राशी
जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊ शकते. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकतो. तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येऊन अचानक धनलाभ होऊ शकतो.
कुंभ राशी
या राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढ होऊ शकते. व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)