Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानले जाते. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. २६ जून रोजी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन होणार असून ८ जुलैपर्यंत शुक्र सूर्याच्या कृतिका नक्षत्रात राहणार आहे. या परिवर्तनाचा शुभ प्रभाव १२ पैकी काहीन नक्कीच पाहायला मिळेल.
शुक्र ‘या’ तीन राशींना करणार मालामाल
मेष (Mesh Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मेष राशीसाठी खूप फायदेशीर सिद्ध होईल. या काळात तुमच्या कामातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होईल. अविवाहितांचे विवाह ठरतील, आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.
मिथुन (Mithun Rashi)
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. जोडीदारबरोबर सुखाचे क्षण व्यतीत कराल. भौतिक सुख प्राप्त कराल.
कन्या (Kark Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कन्या राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. आर्थिक समस्या दूर होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल.
सिंह (Singh Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन सिंह राशीसाठी खूप गुणकारी ठरेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.
धनु (Dhanu Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल.
मीन (Meen Rashi)
शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मीन राशीसाठीदेखील लाभदायी ठरेल. या काळात कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. आकस्मिक धनलाभ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)