Shukra Gochar 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा ग्रह वैभव, धन, प्रेम व भौतिक सुखाचा कारक मानला जातो. असं म्हणतात, जेव्हा एखादा ग्रह आपले स्थान बदलून अन्य राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची अन्य राशींच्या कुंडलीतील स्थितीसुद्धा बदलते. साहजिकच स्थान बदलल्यावर होणारा प्रभावसुद्धा कमी-अधिक, शुभ-अशुभ स्वरूपात बदलत असतो. शुक्र हा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जात असल्याने त्याची स्थिती राशींच्या आयुष्यातील नात्यांवरसुद्धा प्रभावी ठरू शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र २६ जुलै रोजी सकाळी ९:०२ वाजता मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव तीन राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे, असे ज्योतिषविषयक अभ्यासकांचे अंदाज आहेत. या तीन राशींच्या लोकांना शुक्र देवाच्या कृपेने प्रचंड धनलाभाची संधी मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या आणि त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण जाणून घेऊ…
‘या’ राशींच्या लोकांचे चमकणार नशीब!
मिथुन
शुक्राच्या राशी परिवर्तनामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी भाग्योदयाचे योग आहेत. जर आपण नव्या नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यातून प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला गुंतवणुकीतून अत्यंत लाभदायक रिटर्न्स मिळू शकतात. जर तुम्ही परदेश वारीच्या विचारात असाल, तर येत्या काळात तुमचा विचार प्रत्यक्षात उतरण्याची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक व वैवाहिक सुखाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत.
सिंह
शुक्राचे मिथुन राशीतील परिवर्तन सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होऊ शकते. या काळात तुम्हाला पैसे कमविण्याच्या चांगल्या संधीदेखील मिळू शकतात. तसेच, या काळात अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येऊ शकतात. तुमच्या जोडीदाराकडून एखादे मोठे सरप्राईज मिळू शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्याशिवाय तुम्हाला कौटुंबिक सुखसुद्धा प्राप्त होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीचादेखील तुम्हाला लाभ मिळू शकतो.
कन्या
शुक्राचे राशी परिवर्तन कन्या राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान, या राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळू शकतो. पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यापारीवर्गाला व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. तसेच तुमची आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला बढतीदेखील मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)