Shukra Gochar In Ashlesha Nakshatra : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर किंवा वक्री स्थितीत येऊन राशी व नक्षत्र बदल करत असतात. त्यातील एकूण २७ नक्षत्रांपैकी भरणी, कृतिका, माघ आणि आश्लेषा नक्षत्रांमध्ये शुभ कार्य करण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३ सप्टेंबर २०२५ रोजी, प्रेम, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक असलेला ग्रह शुक्र, आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात संक्रमण करणार आहे.आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात शुक्र ग्रहाच्या संक्रमणामुळे १२ पैकी काही राशींच्या आयुष्यात लहान किंवा मोठे नुकसान होऊ शकते. त्याचप्रमाणे अशांतता आणि समस्या सुद्धा येऊ शकतात.

शुक्र ग्रहाचे संक्रमण अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात आर्थिक नुकसानाव्यतिरिक्त, आरोग्याशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. तर या काळात कोणत्या लोकांनी सावधगिरी बाळगली पाहिजे तेही जाणून घेऊया…

वृषभ (Taurus)

आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात शुक्र राशीचे भ्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहणार नाही. आरोग्याशी संबंधित समस्या, खाण्या-पिण्याबाबत अधिक काळजी घ्यावी लागेल. पैशाची कमतरता दूर करण्याचा प्रयत्न सतत करत रहा. लोकांच्या यशाच्या मार्गात अडथळा येऊ देऊ नका. तसेच या काळात कोणालाही उधार म्हणून पैसे देणे टाळा.

कर्क (Cancer)

आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात शुक्राचे भ्रमण असल्याने कर्क राशीच्या लोकांना कठीण काळ बघावा लागू शकतो. जमीन, मालमत्तेशी संबंधित वाद वाढू शकतात. कोणतेही प्रकरण न्यायालयात नेण्याचे टाळा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. नकळतपणे जवळच्या व्यक्तीला फसवू किंवा दुखवू नका.

कन्या (Virgo)

आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या टप्प्यात शुक्राच्या भ्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक नुकसान होऊ शकते, खर्च वाढू शकतो. त्यामुळे या काळात पैसे वाचवण्याकडे अधिक लक्ष द्या. आरोग्याशी संबंधित बाबींबद्दल निष्काळजी राहू नका. पूजा, इतर धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात स्वतःला गुंतवून ठेवा. यामुळे जीवनात सकारात्मकता टिकून राहील.