Shukra Gochar In Singh: ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ठराविक कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. शुक्राला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलासितेचा कारक मानले जाते. सप्टेंबरमध्ये शुक्र १५ सप्टेंबर रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या सिंह राशीतील प्रवेशाने केतू आणि सूर्याबरोबर शुक्राची युती निर्माण होईल. १७ सप्टेंबर रोजी सूर्य सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. शुक्राचे सूर्याच्या राशीतील हे गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
‘या’ चार राशींवर असणार शुक्राची कृपा
मेष (Mesh Rashi)
शुक्राचा राशी बदल मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तूळ राशीच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. त्याचवेळी तुम्हाला काही कामांमध्ये यश मिळेल. जोडीदाराबरोबरचे प्रेमसंबंध मजबूत होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. जीवनात पूर्वीपेक्षा अधिक सकारात्मकता येईल आणि कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल.
सिंह (Singh Rashi)
शुक्र गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. नोकरदारांना त्यांच्या नोकरीत पदोन्नती मिळू शकते. तसेच व्यावसायिकांना व्यवसायात नफा मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. या काळात सिंह राशीच्या लोकांना वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.
तूळ (Tula Rashi)
शुक्राचे गोचर तूळ राशीसाठी अत्यंत लाभकारी ठरेल. या काळात तुमच्या सुख-समृद्धीत घसघशीत वाढ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. प्रत्येक कामात मनासारखे यश मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तसेच, या काळात व्यावसायिकांचे रखडलेले आर्थिक व्यवहार आता पूर्ण होऊ शकतात. या काळात तुमचे अडकलेले पैसे मिळू शकतात आणि नवीन गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे.
धनु (Dhanu Rashi)
शुक्र गोचर धनु राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती साधता येईल, तसेच यावेळी तुम्हाला मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक मार्गांनी तुम्हाला पैसे कमविण्यात यश मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)