Shukra Gochar 2023 Effect: ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. अशातच आता ऑक्टोबरमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदल करणार आहेत. तर संपत्ती आणि समृद्धी देणारा, शुक्र ग्रह २ऑक्टोबरला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा सर्व राशींच्या लोकांवर प्रभाव दिसून येणार आहे. असे मानले जाते की, जेव्हा कुंडलीत शुक्र बलवान असतो तेव्हा व्यक्तीला मान-सन्मान मिळण्याची शक्यता असते. ज्योतिष शास्त्रानुसार सध्या शुक्र कर्क राशीत असून २ ऑक्टोबर रोजी तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशी बदलामुळे ३ राशीच्या लोकांचे उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तर या ३ भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

वृषभ रास

शुक्राचा सिंह राशीत प्रवेश होताच वृषभ राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या राशीचा शासक ग्रह गुरु आहे. त्याच वेळी, वृषभ राशीची देवता दुर्गादेवी आहे. अशा स्थितीत शुक्राचे गोचर या राशीच्या लोकांना विशेष परिणाम देणारे ठरु शकते. या काळात तुम्हाला जीवनातील सर्व सुख प्राप्त होऊ शकतात. तसेच तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते, तसेच शुभ कार्यात यश मिळण्याची दाट शक्यता आहे.

सिंह रास

सिंह राशीचा अधिपती ग्रह सूर्य आहे. शुक्राचा राशी बदलामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात इच्छेनुसार यश मिळू शकते. तसेच या काळात तुमची बिघडलेली कामेही पूर्ण होऊ शकतात. शुक्राचे गोचर तुमच्या उत्पन्नात वाढ करण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या कामांना गती मिळू शकते. तर अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

हेही वाचा- ३० वर्षांनंतर केंद्र त्रिकोण राजयोग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब पालटणार? शनिदेवाच्या कृपेने प्रचंड संपत्ती मिळण्याची शक्यता

तूळ रास

ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीच्या लोकांचा शासक ग्रह शुक्र आहे. तूळ राशीच्या लोकांना या काळात विशेष आनंद मिळू शकतो. ऑक्टोबरमध्ये शुक्राच्या गोचरमुळे तुम्हाला विशेष फळ मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही या काळात फायदा होऊ शकतो. तुम्ही व्यवसायाचा विस्तार करण्यातही यशस्वी होऊ शकता. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोतदेखील उघडू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)