Shukra in Hasta Nakshatra: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशीपरिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार, दैत्यगुरू शुक्र १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सूर्याच्या उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत. या नक्षत्रात तो २८ ऑक्टोबरपर्यंत असेल. या काळात दिवाळी देखील असेल त्यामुळे शुक्राचा हस्त नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या आयुष्यात धनलाभ आणि भौतिक सुख घेऊन येणारा ठरेल.
शुक्राचे गोचर करणार मालमाल
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. भौतिक सुखात प्रचंड मोठी वाढ होईल. करिअर, नोकरीतही पदोपदी यश मिळेल. या काळात तुमच्या कुटुंबात शुभ कार्य होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबीयांची साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे नक्षत्र गोचर अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींना शुक्राचे हे गोचर लाभदायी ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सुद्धा शुक्राचे गोचर पदोपदी यश देईल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)