Dwi Dwadash Rajyog 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या बदलांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. प्रामुख्याने जेव्हा राक्षसांचा गुरू शुक्र आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा परिणाम प्रत्येकाच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे जाणवतो. २ नोव्हेंबर २०२५ रोजी शुक्राने आपल्या प्रिय राशीत म्हणजे तूळ राशीत प्रवेश केला आहे. तूळ राशीत प्रवेश केल्यानंतर मालव्य राजयोग तयार झाला, जो पाच महापुरूष योगांपैकी एक असा सर्वात शुभ योग मानला जातो. या योगाच्या प्रभावामुळे सौंदर्य, समृद्धी, प्रेम आणि भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होते.

तूळ राशीत स्थित शुक्र आता ग्रहांचा राजकुमार मंगळासोबत एक अदभूत युती करत आहे. मंगळ ऊर्जा, धैर्य आणि कृतीचे प्रतीक आहे. तसंच शुक्र प्रेम, कला आणि ऐश्वर्य यांचे प्रतिनिधित्व करतो. जेव्हा हे दोन शक्तिशाली ग्रह एका विशिष्ट कोनात एकत्र येतात तेव्हा ते जीवनाच्या अनेक पैलूंवर परिणाम करतात. यामध्ये पैसा, करिअर, नातेसंबंध आण नशीब यांचा समावेश आहे.

कधी तयार होत आहे हा शुभ योग?

वैदिक गणनेनुसार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४६ मिनिटांनी शुक्र आणि मंगळ एकमेकांपासून ३० अंश अंतरावर असतील. या विशेष युतीमुळे द्विद्वादश योग तयार होईल. हा योग अत्यंत फायदेशीर मानला जातो. हा योग काही राशींसाठी सौभाग्य, आर्थिक लाभ आणि प्रतिष्ठा घेऊन येऊ शकतो. तसंच काहींसाठी हा काळ नवीन सुरूवात आणि क्रिएटिव्ह कामगिरीचा काळ ठरू शकतो.

मेष राशी

शुक्र आणि मंगळाची ही युती मेष राशीच्या सातव्या भावात सक्रिय असेल, ही भागीदारी वैवाहिक संबंध आणि व्यावसायिक संबंधांशी संबंधित आहे. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. वैवाहित सुसंवाद आणि समजूतदारपणा वाढेल. सध्या सुरू असलेले मतभेद दूर होतील. व्यावसायिक भागीदारीमुळे फायदे होतील आणि नवीन करार किंवा डील तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करतील. अविवाहितांना आयुष्यभराचा सोबती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही अधिक आकर्षित व्हाल आणि व्यक्तिमत्व सुधारेल.

धनु राशी

या युतीचा धनु राशीच्या अकराव्या भावावर परिणाम होईल, जो लाभ आणि यश दर्शवतो. हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. सोशल नेटवर्किंग आणि संपर्काद्वारे नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या कारकि‍र्दीत उच्च पद किंवा पदोन्नती शक्य आहे. मित्र किंवा प्रभावशाली लोकांकडून मदत मिळाल्याने महत्त्वपूर्ण यश मिळू शकते.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या बाराव्या घरात शुक्र आणि मंगळाची युती आहे, जी परदेशातील भूमी, अध्यात्म आणि लपलेल्या लाभांचे प्रतिनिधित्व करते. या युतीमुळे तुम्हाला अनपेक्षित फायदे मिळू शकतात. परदेश प्रवास किंवा परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कला , डिझाइन किंवा माध्यमांमध्ये गुंतलेल्यांना प्रसिद्धी आणि नवीन संधी मिळू शकतात. जुन्या समस्या आणि मानसिक ताण कमी होतील, त्यामुळे तुमचे मन शांत राहील. नवीन प्रकल्प किंवा क्रिएटिव्ह कामाचे प्रयत्न सुरू करण्यासाठी हा योग्य काळ आहे.