Venus Transit in Purva Bhadrapada: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्राच्या राशी परिवर्तनासह नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते.

ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह १७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी पूर्वाभाद्रपद नक्षत्रामध्ये वेश करणार असून शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल.

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन ठरणार लाभदायी

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

मकर

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

हेही वाचा: २२ महिन्यानंतर मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी अन् प्रत्येक कामात यश

कुंभ

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक ठरेल. या काळात कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. आई-वडीलांची साथ मिळेल. वैवाहिक आयुष्यही सुखमय सिद्ध होईल. महिला वर्गासाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)