Shukraditya Raj Yoga September 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठरलेल्या वेळेला आपली राशी बदलतो आणि त्याचा परिणाम मानव जीवनावर सकारात्मक तसेच नकारात्मक दोन्ही रूपात दिसतो. काही ग्रह जेव्हा एकाच वेळी एका राशीत राहतात आणि दुसरे ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, तेव्हा शुभ अशुभ योग तयार होतात. अशीच एक विशेष योग रचना सप्टेंबरच्या मध्यात बनणार आहे, जी आपल्या जीवनावर विशेष परिणाम करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर महिना ग्रह-नक्षत्रांच्या दृष्टीने अत्यंत खास आहे. सूर्य आता आपल्या स्वराशी सिंह राशीत विराजमान आहे आणि शुक्र १५ सप्टेंबरला गोचर करणार आहे. या युतीमुळे बनणार शुक्रादित्य राजयोग, जो अत्यंत शुभ मानला जातो. या योगाचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसेल, पण विशेषतः तीन राशींवर सकारात्मक परिणाम अधिक ठळक होईल. कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…पाहूयात…

शुक्रादित्य राजयोगामुळे खुलणार नशिबाचे दरवाजे, ‘या’ राशींवर होईल धनवर्षाव?

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना हा योग संपत्ती, भौतिक सुख आणि करिअरमध्ये प्रगती देणार आहे. व्यवसाय आणि नोकरी दोन्हीत वाढीचा योग आहे. वाहन, जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदीसाठी योग अनुकूल राहील. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल, नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल, तर नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्यादेखील प्राप्त होऊ शकतात. आध्यात्मिक कार्यांमध्ये रस वाढेल.

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग आयुष्यातील नवे स्रोत आणि वित्तीय लाभ घेऊन येणारा ठरू शकतो. शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केटमध्ये केलेल्या गुंतवणुकीत लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात केलेला निवेश दुप्पट नफा देऊ शकतो. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील आणि संतान सुखाची प्राप्ती होईल. बौद्धिक कार्यांमध्ये यश मिळेल आणि समाजात मान-सन्मान वाढेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना हा योग कोर्टाच्या प्रकरणात यश, मालमत्ता खरेदीसाठी अनुकूल योग देईल. कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कामासाठी प्रवास करावा लागला तरी तो लाभदायक ठरू शकतो. माता-पित्यांचे आरोग्य उत्तम राहील आणि संतानाकडून शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

शेवटी, या योगाचा संदेश स्पष्ट आहे, सप्टेंबरच्या मध्यात येणारा शुक्रादित्य राजयोग तुमच्या जीवनात संपत्ती, यश, प्रगती आणि सौख्याचे नवे पर्व सुरू करू शकतो. योग्य काळजी, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन यासोबत घेतल्यास, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी होऊ शकता.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)