Surya Shani Samasaptak Yog Effects: यंदाचं सूर्यग्रहण नेहमीसारखं शांत जाणार नाही, असं ज्योतिष तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मागील वर्षाप्रमाणेच या वर्षीही सूर्यग्रहण कन्या राशीत लागणार आहे. भारतीय वेळेनुसार हे ग्रहण २१ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजल्यानंतर दिसणार असल्यामुळे भारतात याचा सुतक काल मान्य राहणार नाही. तरीदेखील या ग्रहणाचे शुभ-अशुभ परिणाम थेट राशींवर होणार आहेत.
या वेळी वैशिष्ट्यपूर्ण योग घडणार आहे. कारण- सूर्य कन्या राशीत असताना, शनी मीन राशीत विराजमान असतील आणि त्यामुळे समसप्तक योग तयार होईल. हा योग निर्माण झाल्यावर काही राशींच्या लोकांवर प्रचंड मानसिक तणाव, आर्थिक तोटा होण्यासह नातेसंबंधांना तडे जाण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. चला तर पाहूयात कोणत्या राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता आहे.
वृषभ – प्रेमसंबंधांवर संकटाची छाया
ग्रहण तुमच्या राशीपासून पंचम भावात लागणार आहे. हा भाव शिक्षण, प्रेमसंबंध व भावना यांचा कारक मानला जातो. शनी एकादश भावात असल्यामुळे तुमच्या आयुष्यात अस्थिरता वाढू शकते. प्रियकर-प्रेयसीमध्ये गैरसमज, तणाव किंवा दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या नोकरीवर गदा येऊ शकते. या काळात कुठलाही मोठा आर्थिक निर्णय न घेणेच हितावह ठरेल.
सिंह – अचानक होणाऱ्या खर्चांपासून सावध राहा
द्वितीय भावात सूर्यग्रहण होणार आहे आणि शनी-सूर्य समसप्तक योगामुळे धनहानीची शक्यता वाढते. अचानक खर्च वाढतील, ज्यामुळे बजेट बिघडू शकते. करिअर आणि नोकरीत समस्या येऊ शकतात. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे वाईट वागणे त्रासदायक ठरू शकते. पालकांशी बोलताना मर्यादा ओलांडू नका; अन्यथा संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो. करिअरबाबत घाईघाईत निर्णय टाळा; अन्यथा वाईट परिणाम दिसू शकतात.
मीन – आरोग्य आणि नातेसंबंधांवर फटका
तुमच्या राशीत शनी विराजमान आहेत, तर सप्तम भावात सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे पोटाशी संबंधित त्रास, थकवा किंवा आजारपण येऊ शकते. विवाहितांना जोडीदाराशी मतभेद जाणवतील. स्वतःचे मत लादण्याऐवजी संवाद साधा; अन्यथा वैवाहिक जीवनात मोठा तणाव येऊ शकतो. लोकांनी वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. अत्यंत सावधगिरी बाळगा, नियमांचे पालन करा. नोकरी शोधणाऱ्यांना मेहनत वाढवावी लागेल. कारण- आळस तुम्हाला मागे खेचू शकतो.
एकंदरीत, हे सूर्यग्रहण सर्वांसाठी धोकादायक नाही; पण या तीन राशींच्या लोकांनी मात्र विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्रश्न असा की, तुमची रास या यादीत आहे का?
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)