Budh And Sun Gochar In Kanya: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह हा वाणी, बुद्धिमत्ता आणि व्यवसायाचा कारक मानला जातो तर सूर्य देवाला आत्मविश्वास, सन्मान, प्रतिष्ठा, राजकारण, सरकारी नोकरी आणि प्रशासकीय सेवेचा कारक मानले जाते. सप्टेंबर महिन्यात बुध ग्रह त्याच्या उच्च राशी कन्या राशीत असेल तर सूर्य देव देखील कन्या राशीत भ्रमण करेल. त्यामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. यासोबतच, या राशींच्या लोकांना उत्पन्नात वाढ आणि नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…

मिथुन राशी

बुध आणि सूर्याच्या राशीतील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण बुध आणि सूर्य तुमच्या राशीतून सुख-समृद्धीच्या घरात संक्रमण करतील. त्यामुळे, यावेळी तुम्हाला भौतिक सुख मिळेल.तसेच, तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचे सुख देखील मिळू शकते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक सन्मान वाढेल. या दोन्ही ग्रहांची युती तुमच्या राशीच्या कर्मभावावर पडत आहे.त्यामुळे, या वेळी तुम्हाला काम आणि व्यवसायातही प्रगती मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते.

धनु राशी

बुध आणि सूर्याचे भ्रमण धनु राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. कारण बुध तुमच्या भ्रमण कुंडलीच्या दहाव्या घरात भ्रमण करेल. त्यामुळे, या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात यश मिळू शकते.तसेच, व्यवसायातील बाबींवर तुमचे लक्ष अधिक नफा मिळविण्यावर आणि तुमचा नवीन व्यवसाय सुरू करण्यावर असेल. कामाच्या ठिकाणी तुमची सर्जनशीलता आणि नेतृत्व कौशल्ये कौतुकास्पद असतील आणि तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात.नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. तुमच्या वडिलांसोबतचे तुमचे नाते दृढ राहील.

कन्या राशी

रवि आणि बुध यांचा युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या राशीच्या लग्नाच्या भावात तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढेल. यासोबतच तुमची कार्यशैलीही सुधारेल.विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहील. विद्यार्थ्यांच्या मनातून अनिश्चिततेची भीती नाहीशी होईल.सामाजिक संबंधांमध्ये निर्माण होणारे गैरसमज कमी होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळेल.