Astrology: वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य ग्रहाला अधिक महत्त्व दिले गेले आहे. सूर्याला देवता मानून त्याची पूजा केली जाते. सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो. ज्या राशींवर सूर्याची कृपा असते त्याला कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. चला जाणून घेऊया कोणत्या राशींवर सुर्यदेवाची कृपा असते.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यदेवाचा शुभ प्रभाव असतो. त्यांना कामाच्या आणि करिअरच्या क्षेत्रात सकारात्मक परिणाम मिळतात. तर दुसरीकडे ज्यांच्या कुंडलीत सूर्यदेव अशुभ स्थितीत असतो. त्यांना नोकरी, वैयक्तिक जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सूर्य देव सिंह राशीचा स्वामी आहे आणि मेष हा उच्च राशीचा आहे.

सिंह राशी

सूर्यदेव सिंह राशीचा स्वामी आहे. सिंह राशीवर सूर्यदेवाची विशेष कृपा असते. या राशीच्या लोकांना सूर्य देव नेहमी साथ देतो. नवीन नोकरी शोधणाऱ्यांसाठी या काळात सूर्यदेव मदत करू शकतो. यासोबतच ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी देखील हा काळ शुभ असेल. सूर्यदेवाची प्रिय राशी असल्याने या राशीच्या लोकांना कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. आर्थिकदृष्ट्या देखील हा काळ सिंह राशीसाठी चांगला असेल.

( हे ही वाचा: जानेवारी २०२४ पर्यंत ‘या’ ७ राशी होणार श्रीमंत? ग्रहांच्या साथीने मिळणार प्रचंड धनलाभाची संधी)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेष राशी

मेष राशींच्या लोकांसाठी लोकांवर सूर्यदेव नेहमी प्रसन्न असतात. या काळात मेष राशीच्या लोकांना करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच या काळात तुम्ही एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. सूर्य देवाची कृपा तुमच्यावर असल्याने या काळात तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. यासोबतच तुमचा समाजातील मानसन्मान देखील वाढेल.