Surya Nakshatra Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार सूर्यदेव हे यश, आत्मविश्वास, मानसिक बळ, नोकरी, नेतृत्व यांचे कारक मानले जातात. सूर्याच्या कुंडलीतील स्थितीनुसार तुमच्या राशीच्या भाग्यात अनेक बदल घडत असतात. आता ३ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजून १६ मिनिटांनी ग्रहांचा राजा सूर्य अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा नक्षत्र गोचर काही खास राशींना मोठं यश, सन्मान आणि जीवनातील अनपेक्षित बदल देणार आहे. अश्लेषा नक्षत्रावर बुधचा प्रभाव असल्यामुळे, बुध आणि सूर्य या दोघांची शक्ती काही राशींना करिअर आणि व्यवसायामध्ये जबरदस्त प्रगती देणार आहे. या सूर्य ग्रह नक्षत्र गोचराचा राशीचक्रावर कसा प्रभाव पडणार आहे व कोणत्या राशींना कसा लाभ होणार आहे हे ही पाहूया…

नशिबाचा खेळ बदलणार! ‘या’ राशींना मिळणार मोठं यश आणि पैसा!

कर्क

सूर्य तुमच्या लग्न भावात गोचर करणार असून या राशींच्या मंडळीसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि करिअरमध्ये नाव कमवता येईल. या कालावधीत गुंतवणूकीत तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. नात्यात गोडवा येण्याची शक्यता आहे.

मिथुन

सूर्य दुसऱ्या भावात असल्यानं मार्केटिंग, सेल्ससारख्या क्षेत्रात जबरदस्त यश मिळेल. आर्थिक बाबतीतही प्रगती होऊ शकेल. करिअरमध्ये प्रगती दिसून येऊ शकते. कामाच्या संदर्भात केलेले प्रवास फलदायी ठरू शकतील. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

तूळ

दशम भावात सूर्याचं आगमन झाल्यानं कामाच्या ठिकाणी मोठं नाव होण्याची शक्यता. प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. या कालावधीत तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित पैसे मिळू शकतात.

वृश्चिक

नवम भावामध्ये सूर्याचा गोचर तुम्हाला चांगले दिवस देऊ शकतो. अडलेली कामे मार्गी लागू शकतात. व्यापारात विस्तार आणि आर्थिक लाभाच्या शक्यता निर्माण होतील. या काळात एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. आपल्या कार्यानं समाजात आपला मान-सन्मान वाढू शकतो.

मीन

पंचम भावात सूर्य असल्यानं प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. जीवनात अनेक सुखाचे क्षण दार ठोठावू शकतात. वाहन खरेदी करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर ही इच्छा देखील तुमची या काळात पूर्ण होऊ शकते. पैशाची आवक वाढू शकते. संततीसंबंधीही शुभ वार्ता मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)