Why Not to Keep 3 Rotis in Plate: आपण जेवताना ताटात पोळी, भाजी, भात अगदी सहज रचतो. आपल्या घरातील मोठ्यांनी अनेकदा बजावलेलं असेल, “ताटात तीन पोळ्या कधीही ठेवू नयेत.” अगदी प्रसादात तीन फळं, तीन लाडू किंवा कोणतीही तीन वस्तू एकत्र ठेवण्यासही नेहमी मनाई केली जाते. प्रथम ऐकताना हे आपल्याला साधं-सरळ वाटतं. कुणाला वाटतं अंधश्रद्धा आहे, तर कुणी हसून दुर्लक्ष करतं. पण, खरंच का फक्त योगायोग आहे? की यामागे दडलेलं आहे एखादं गूढ रहस्य? तुम्हालाही कधी प्रश्न पडला असेल, यात नेमकं असं काय विशेष आहे? का बरं ताटात तीन पोळ्या ठेवण्यास टोकाचा विरोध केला जातो?
हिंदू धर्मात खाणं-पिणं, झोपणं, पूजा-पाठ यापासून ते साध्या ताटात काय ठेवावं, यालाही प्रचंड महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणतात ना “अन्न हेच ब्रह्म आहे.” मग जेवणाच्या ताटात एकाच वेळी तीन पोळ्या का ठेवू नयेत, याचं उत्तर केवळ धार्मिक कारणांमध्येच दडलं नाहीये, तर त्यामागे शास्त्र, परंपरा आणि थेट आरोग्याशी निगडित मोठं कारणही लपलं आहे.
काही मान्यतेनुसार ताटात तीन पोळ्या ठेवणे हे मृत्यू संस्काराशी जोडलेले आहे. तर काही जण सांगतात की असं केल्याने नकळत नकारात्मक उर्जा थाळीत येते. इतकंच नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तरी तीन पोळ्या खाल्ल्यास शरीरावर कसा परिणाम होतो याबाबत धक्कादायक माहिती पुढे येते. मग अखेर खरं काय? तीन पोळ्या एकत्र ठेवणं म्हणजे अंधश्रद्धा की खरा धोका? धार्मिक कारण, शास्त्रीय कारण आणि आरोग्याचा संबंध याचा उलगडा वाचल्याशिवाय तुम्ही पुढे जेवायला बसणार नाही, एवढं नक्की.
हिंदू धर्मात अनेक प्राचीन मान्यता आणि परंपरा आजही जपल्या जातात. त्रिदेव ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांनी सृष्टीची निर्मिती केल्यामुळे ३ हा अंक शुभ मानला जातो, अशी आपली धारणा आहे. पण, आश्चर्य म्हणजे, शास्त्रांमध्ये अनेक शुभ कार्यात ३ हा अंक अशुभ मानला जातो, त्यामुळेच आजही आपले ज्येष्ठ ताटात ३ पोळ्या ठेवण्यापासून आपल्याला परावृत्त करतात.
यामागे एक मोठं गुपित लपलेलं आहे. मृत्यूनंतर होणाऱ्या त्रयोदशी संस्कारात मृतात्म्यासाठी अन्न देताना ताटात ३ पोळ्या ठेवण्याची परंपरा आहे. ही थाळी फक्त मृतकाला अर्पण केली जाते, इतर कोणी पाहू नये अशी समजूत आहे; त्यामुळे जिवंत व्यक्तीच्या थाळीत ३ पोळ्या ठेवणं म्हणजे नकळत मृतात्म्यास अन्न अर्पण केल्यासारखं मानलं जातं.
तसंच, आणखी एका मान्यतेनुसार जेव्हा कोणी ताटात ३ पोळ्या ठेवून खातो, तेव्हा त्याच्या मनात इतरांविषयी वैरभाव किंवा शत्रुत्वाची भावना निर्माण होते, म्हणूनच ३ हा आकडा अन्नाशी संबंधित कोणत्याही कार्यात टाळला जातो.
पण, एवढ्यावरच गुपित संपत नाही… वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. तज्ज्ञांच्या मते, एका सामान्य व्यक्तीच्या पचनसंस्थेसाठी सकाळ-संध्याकाळ एक वाटी भाजी, एक वाटी डाळ, ५० ग्रॅम भात आणि २ पोळ्या इतकं जेवण पुरेसं असतं. त्यापेक्षा जास्त खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्या, वजन वाढ, कोलेस्ट्रॉल आणि शुगरसारख्या आजारांचा धोका वाढतो. म्हणजेच ३ पोळ्या खाल्ल्या तर फक्त धार्मिकच नव्हे तर आरोग्यदृष्ट्याही हानिकारक परिणाम होऊ शकतो.
ताटात ३ पोळ्या ठेवण्यामागे धर्मशास्त्रीय गूढ, मृतात्म्याशी संबंधित मान्यता आणि आधुनिक विज्ञान या तिन्हींचा संगम आहे. म्हणूनच आजही आपल्या ज्येष्ठांनी दिलेला इशारा “३ पोळ्या कधीही ताटात ठेवू नका” हा केवळ अंधश्रद्धा नसून, त्यामागे खोल अर्थ आणि आरोग्याचा धडा दडलेला आहे.
आता तुम्हीही पुढे ताटात ३ पोळ्या ठेवताना दोनदा विचार कराल, नाही का?
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)