Surya-Mangal Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह ठराविक काळाने गोचर करतात आणि इतर ग्रहांशी युती करतात. ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता १८ महिन्यांनंतर मार्चमध्ये कुंभ राशीमध्ये सूर्य आणि मंगळ या दोन ग्रहांची युती होणार आहे. या युतीचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु ३ राशी अशा आहेत, ज्यांचे नशीब या काळात चमकू शकते. तसेच व्यवसायातही प्रगती होऊ शकते. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

‘या’ राशींना धनलाभ होणार?

मेष राशी

सूर्य आणि मंगळाची युती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या राशींच्या लोकांना आनंदाची बातमी मिळू शकते. रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कामात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ ठरु शकतो. अविवाहितांना मनासारखा जोडीदार लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: होळीनंतर ७ दिवसांनी ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? राहू-शुक्रदेवाची युती होताच लक्ष्मी कृपेने मिळू शकतो अपार पैसा )

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि मंगळाची युती लाभदायी ठरु शकते. यावेळी नशीब तुमच्या बाजूने असण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती पूर्वी पेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. वैवाहिक जीवनातून आपल्याला खूप आनंद मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे.

मकर राशी

सूर्य आणि मंगळाची युती होताच मकर राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचा पगार वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमचं बँक बॅलेन्स झपाट्याने वाढू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा कमावण्याची संधी मिळू शकते. या काळात तुम्ही घर, वाहन, जमीन इत्यादी खरेदी करु शकता. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी चांगल्या जोडीदाराचा प्रस्ताव येऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)