Surya Dev Favourite Rashi : हिंदू धर्मामध्ये रविवारला सूर्य देवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. असं म्हणतात की या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने त्यांच्यावर विशेष कृपा दिसून येते. तसेच त्यांच्या कृपेमुळे जीवनात प्रत्येक संकटापासून मुक्तता मिळते. जर कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर कोणताही ग्रह दोष असेल तर त्यांनी नियमित सूर्यदेवाला जल अर्पित करावे. (Surya Dev Favourite Rashi)

असं म्हणतात, असं केल्याने सर्व ग्रह दोष दूर होतात. तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये १२ राशींविषयी सांगितले आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, १२ राशींमध्ये काही राशी अशा आहेत ज्या सूर्यदेवाला अतिशय प्रिय आहेत. या राशींवर सूर्यदेव नेहमी कृपा दर्शवतात. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

हेही वाचा – २५ नोव्हेंबर पंचांग: सोमवारी ‘या’ तीन राशींवर बरसणार भोलेनाथांची कृपा; आठवड्याच्या सुरवातीला दुःख-संकट वाटेतून होतील दूर, वाचा तुमचा कसा असेल दिवस?

जाणून घेऊ या सूर्यदेवाच्या प्रिय राशी कोणत्या आहेत?

मेष राशी (Mesh Rashi)

मेश राशी ही राशिचक्रातील सर्वात पहिली रास आहे आणि या राशीचे स्वामी ग्रह मंगळ आहे. या राशीच्या लोकांवर सूर्यदेवाची विशेष कृपा दिसून येते. त्यामुळे या मेष राशीचे लोक अत्यंत धाडसी, ऊर्जावान आणि आत्मविश्वासू असतात. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळते. हे लोक त्यांचे काम अत्यंत प्रामाणिकपणे पूर्ण करतात. सूर्यदेवाच्या कृपेने हे लोक प्रत्येक क्षेत्रात नाव कमावतात.

सिंह राशी (Singh Rashi)

सिंह राशी ही सूर्य देवाची स्वत:ची राशी आहे. त्यामुळे या राशीचे लोक सूर्य देवाचे अत्यंत प्रिय मानले जातात. या राशीच्या लोकांमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता अधिक असते. या लोकांना खूप आत्मविश्वास असतो. यांना धनसंपत्ती संबंधित कोणतीही समस्या जाणवत नाही. हे लोक करिअरमध्ये खूप यशस्वी होतात. सूर्य देव सुद्धा या राशींवर नेहमी कृपा दर्शवतात.

हेही वाचा – Vastu Tips : घरात ‘या’ दिशेला चुकूनही लावू नका घड्याळ अन् आरसा, करावा लागेल भयंकर संकटाचा सामना! वास्तु शास्त्र काय सांगते वाचा

धनु राशी (Dhanu Rashi)

धनु राशीचे स्वामी गुरू बृहस्पती आहे जे स्वत: सूर्य देवाला गुरू मानतात. सूर्य देवाच्या कृपेने धनु राशीचे लोक समजूतदार आणि बुद्धिमान असतात. हे लोक शिक्षण, लिखाण, न्याय आणि व्यवसायात भरपूर यशस्वी होतात. या राशीच्या लोकांना संपत्ती आणि पैसा दोन्ही मिळतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)