ग्रहांचा राजा मानल्या जाणार्‍या सूर्य देवाचे शनिवार, १६ जुलै रोजी कर्क राशीत राशी परिवर्तन झाले आहे. सूर्यदेव महिनाभर या राशीत राहतील. कर्क राशीचा स्वामी चंद्र देव आहे आणि सूर्य देव त्याच्या मित्राच्या राशीत प्रवेश करणार आहे. अग्नी आणि जल तत्वाचे हे मिश्रण सर्व राशींसाठी खूप महत्वाचे असेल. चला जाणून घेऊया सूर्यदेवाच्या कोणत्या राशींचा त्यांच्या जीवनावर शुभ प्रभाव पडेल?

सूर्य राशी परिवर्तनाचा कालावधी
शनिवार, १६ जुलै २०२२ रोजी रात्री १०.५० वाजता सूर्यदेवाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. १७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ७.१४ वाजता स्वराशी सिंह येथे भ्रमण होईपर्यंत ते येथेच राहतील.

मेष: व्यावसायिक जीवनात तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील, विशेषत: तुम्ही सरकारी नोकरी करत असाल तर तुमची चांगली प्रगती होऊ शकते. बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची दाट शक्यता आहे. पण, तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काही उलथापालथ होऊ शकते. या काळात तुमचा रागीट स्वभाव तुमच्या घरातील शांतता भंग करू शकतो. आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा टाळण्याचा प्रयत्न करा.

आणखी वाचा : Shani Vakri 2022: ‘या’ गोष्टी केल्याने शनिदेव होतील क्रोधीत, कोणत्या राशीच्या व्यक्तींवर असते कृपा?

कन्या : तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर सूर्यदेवाच्या कृपेने तुम्हाला इच्छित नोकरी मिळू शकते. दुसरीकडे व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या धोरणात किंवा व्यवसायाच्या योजनांमध्ये काही बदल केले तर त्यांना योग्य परिणाम मिळू शकतात. कौटुंबिक जीवनात परिस्थिती आनंददायी राहील. तुमचे संबंध मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या प्रियजनांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. या काळात तुम्ही काही नवीन मित्र देखील बनवू शकता. रोमँटिक जीवनात परिस्थिती प्रतिकूल दिसत आहे. जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर खाण्यापिण्यात अडथळे आणणे टाळावे लागेल.

आणखी वाचा : Nag Panchami 2022: कधी आहे यंदाची नागपंचमी? जाणून घ्या पूजेचा शुभमुहूर्त, पूजा विधी आणि महत्व

तूळ: तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल आणि तुमच्या करिअरमध्ये नवे वळण येईल. पगारदार लोकांना कामाच्या ठिकाणी आपली प्रतिभा दाखवण्याच्या अनेक सुवर्ण संधी मिळतील. या दरम्यान, ऑफिसमध्ये तुमची प्रतिष्ठा देखील वाढेल. विक्री आणि मार्केटींग संबंधित लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. वडिलांसोबत तुमचे नाते मजबूत होईल. या काळात तुम्हाला त्यांचा स्नेह आणि पाठिंबा मिळेल.

आणखी वाचा : २८ जुलैला बनतोय गुरु पुष्य योग, गुरु आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी ‘या’ गोष्टी खरेदी करणं शुभ मानलं जातं!

वृश्चिक: तुमची नशिबाची बाजू मजबूत असेल आणि तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपेक्षित परिणाम मिळू शकतात. तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर या काळात तुम्हाला हवी असलेली नोकरी मिळू शकते. दुसरीकडे, जर तुम्ही आधीच काम करत असाल तर पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. रिअल इस्टेट आणि ट्रॅव्हल इंडस्ट्रीशी निगडित लोकांसाठीही हा काळ चांगला जाणार आहे. या काळात धार्मिक कार्यात तुमची रुची वाढू शकते आणि तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळालाही भेट देऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कुंभ : सूर्यदेवाचे हे राशी परिवर्तन नोकरी करणाऱ्यांसाठी खूप शुभ राहील. तुमच्यासाठी प्रगतीची दारे उघडू शकतात. भूतकाळात केलेल्या मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला नाही. तुम्हाला विशेषत: कायदेशीर बाबींमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो, कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. याशिवाय, तुम्हाला कर्ज घेणे किंवा कर्ज देणे टाळण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रेम जीवन असो किंवा वैवाहिक जीवन, या काळात तुम्हाला काही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.