Surya Transit In Singh Rashi: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे काही निश्चित कालावधीनंतर राशी परिवर्तन होते; ज्याचा १२ प्रभाव राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. इतर ग्रहांप्रमाणेच सूर्यदेखील ठराविक काळानंतर राशी परिवर्तन करतो. सूर्याच्या परिवर्तनामुळे १२ राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात विविध बदल आपल्याला पाहायला मिळतात.

सूर्य लवकरच स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करील, सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश नेहमीच शुभ मानला जातो. येत्या १६ ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीत प्रवेश करणार असून सूर्याच्या या राशी परिवर्तनामुळे काही राशीच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.

‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार

मेष (Mesh Rashi)

सूर्याच्या सिंह राशीतील राशी परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंह (Singh Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या सिंह राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

धनु (Dhanu Rashi)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याच्या धनु राशीतील राशी परिवर्तनाने धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक बदल होतील. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)