Surya Grahan 2022: या वर्षी २०२२ मध्ये दोन सूर्यग्रहण होणार आहेत. ३० एप्रिलच्या मध्यरात्री वर्षातील पहिले सूर्यग्रहण होत आहे. मात्र हे सूर्यग्रहण अर्धवट असेल. हे ग्रहण मध्यरात्री १२.१५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ४:८ पर्यंत चालेल. तसेच ग्रहण मेष राशीत होणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार हे ग्रहण भारतात दिसणार नाही किंवा तो सुतक काळ मानला जाणार नाही. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेचा नैऋत्य भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या राशींचे विशेष फायदे होऊ शकतात:
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा ग्रहण होते तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. सूर्य या ग्रहाला ग्रहांचा राजा म्हणतात. तसंच सूर्यदेव सन्मान आणि प्रतिष्ठेशी संबंधित आहे. त्याचबरोबर सूर्यग्रहणाची स्थिती ज्योतिषशास्त्रात अशुभ मानली जाते. असे मानले जाते की जेव्हा ग्रहण असते तेव्हा सूर्याला त्रास होतो आणि शुभ परिणाम कमी होतात. या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर असेल, परंतु अशा ४ राशी आहेत ज्यांचे विशेष लाभ होऊ शकतात. चला जाणून घेऊया या ४ राशी कोणत्या आहेत.

वृषभ: हे ग्रहण तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. अपूर्ण व्यवसाय करता येतील. व्यवसायात भाग्य तुम्हाला साथ देईल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

आणखी वाचा : Shani Dev : ३ दशकांनंतर शनिदेव बदलणार आहेत राशी, या तीन राशींच्या व्यक्तींचं दुःख दूर होणार

कर्क : हे ग्रहण तुमच्या राशीसाठीही लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुम्हाला कामात यश मिळेल. तुम्हाला मित्रांकडून लाभ मिळू शकतो आणि त्याच बरोबर कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमची प्रतिमा चांगली होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारू शकते, ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते.

आणखी वाचा : Holi 2022: होलिकाचे भस्म घरी घेऊन करा हा उपाय, देवी लक्ष्मीची मिळेल कृपा

तूळ : हे ग्रहण तुमच्यासाठीही खूप शुभ असणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. तुम्ही बिझनेस ट्रिपला देखील जाऊ शकता. व्यवसायात नवीन डील फायनल होऊ शकते. तसेच यावेळी भागीदारीच्या कामात लाभ होऊ शकतो.

धनु: सूर्यग्रहण तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम आणेल, या काळात तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात नोकरी मिळण्याची संधी मिळेल आणि प्रगतीचे फायदे होतील. तसेच, व्यवसायात मोठी डील फायनल होऊ शकते. गुरु हा धनु राशीचा स्वामी आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य आणि गुरु या ग्रहामध्ये मैत्रीची भावना आहे. त्यामुळे हे ग्रहण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya grahan 2022 date time india solar eclipse 30 april 2022 sutak kaal grahan timings prp
First published on: 12-03-2022 at 21:10 IST