Swapna Shastra: झोपल्यानंतर स्वप्न पडणे ही सामान्य गोष्ट आहे आणि प्रत्येकाला काही ना काही स्वप्न पडते. काही स्वप्न उठल्यानंतर आपण विसरून जातो आणि काही स्वप्न अशी असतात, जी दिवसभर डोक्यातून जात नाहीत. कित्येकदा स्वप्नांचा अर्थ जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. पण, तुम्हाला माहितीये का प्रत्येक स्वप्नामध्ये चांगला किंवा वाईट संकेत लपलेला असतो? होय. स्वप्न शास्त्रानुसार, जर प्रत्येक स्वप्न आपल्याला काही तरी सांगते आणि स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी येणाऱ्या भविष्याच्या दिशेने इशारा करतात असे मानले जाते. काही स्वप्न अशी असतात जी संकेत देतात की, येणाऱ्या काळात तुमच्याबरोबर काहीतरी चांगले घडणार आहे.

या गोष्टी स्वप्नात पाहणे मानले जाते शुभ

जर तुम्हाला स्वप्नामध्ये पाऊस दिसला तर तुमच्यासाठी हा शुभ संकेत आहे. स्वप्न शास्त्रानुसार, या स्वप्नाचा अर्थ तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या लवकरच समाप्त होतील. तसेच उत्पन्नाचे नवीन साधनदेखील मिळणार आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ होणार आहे.

Surya And Guru Conjunction Marathi News
वाईट काळ संपेल! १३ एप्रिलपासून ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? २ ग्रहांची युती होताच मिळू शकतो चांगला पैसा
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा
Surya Shani Yuti
शनि-सूर्यदेवाची युती संपल्याने ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
dreams
Swapna Shastra : स्वप्नात ‘या’ जवळच्या व्यक्तींना पाहणे मानले जाते शुभ संकेत

स्वप्न शास्त्रानुसार, जर कोणत्याही व्यक्तीला स्वप्नामध्ये पांढरा हत्ती दिसला, तर तो येणाऱ्या चांगल्या काळाचा संकेत आहे. हे स्वप्न सांगते की, तुम्हाला लवकरच धन लाभ होणार आहे, ज्यामुळे तुमचे नशीब बदलणार आहे.

हेही वाचा – मनी प्लांट लावताना चुकूनही करू नये ‘ही’ चूक; अन्यथा घरामध्ये येऊ शकते गरिबी; वास्तुशास्त्र काय सांगते ते जाणून घ्या ….

कित्येकदा आपण स्वप्नामध्ये मंदिर पाहतो आणि स्वप्न शास्त्रानुसार मंदिर दिसणे हा एक खास संकेत आहे. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात मंदिर दिसणे शुभ मानले जाते, याचा अर्थ तुमच्यावर भगवान कुबेराची कृपा होणार आहे आणि तुमची आर्थिक संकटातून सुटका होईल असे मानले जाते.

स्वप्नात मुंग्या दिसणेदेखील शुभ मानले जाते. हे स्वप्न सांगते की, येत्या काळात तुमची सर्व कामे यशस्वी होतील. एखादे काम खूप दिवसांपासून अडकले असेल तर ते पूर्ण होईल आणि कुठेतरी अडकलेले पैसे लवकरच परत मिळतील.

हेही वाचा – अशी कोणती गोष्ट आहे की, जी मनुष्य मृत्यूनंतरही स्वत:बरोबर घेऊन जातो? ‘चाणक्य नीती’मध्ये सांगितले आहे उत्तर; जाणून घ्या ….

जर एखाद्या व्यक्तीने स्वप्नात स्वतःला झाडावर चढताना किंवा एखाद्या उंच ठिकाणी जाताना पाहिले तर हे स्वप्नदेखील शुभ मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार या स्वप्नाचा अर्थ असा होतो की, तुमची करिअरमध्ये प्रगती होणार आहे. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला फायदा होईल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून लोकसत्ता याची पुष्टी करत नाही)