२५ ऑक्टोबरला यावर्षातील दुसरे सूर्यग्रहण झाले. त्याच्याच मागोमाग आता यावर्षातील दुसरे चंद्रग्रहण होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हे चंद्रग्रहण अशुभ मानले जात आहे. ८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी यावर्षात शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. त्याचबरोबर हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार असला तरीही तीन राशींच्या लोकांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रग्रहणाची वेळ :

हे चंद्रग्रहण दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी संपेल. चंद्रग्रहणाच्या नऊ तासांआधी सुतक काळ सुरु होतो.

जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. हे चंद्रग्रहण भारतासह, ऑस्ट्रेलिया, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, रशिया, चीन, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ आणि जपान या देशांमध्ये दिसेल. हे चंद्रग्रहण कोणत्या राशींसाठी नुकसानदायक ठरू शकते ते जाणून घेऊया.

११ नोव्हेंबरनंतर बदलू शकतात ‘या’ सहा राशींचे दिवस; शुक्रदेवाच्या संक्रमणामुळे धनलाभाचे प्रबळ योग

  • मेष

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीमध्येच हे चंद्रग्रहण होणार असल्याने या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण कष्टकरी ठरू शकते. या कालावधीत व्यवसायात कोणताही नवा करार करताना काळजी घ्यावी. अपघाताचे योग तयार होत असल्याने वाहन चालवताना सावध राहावे. तसेच या काळात मनात चिंता असू शकते.

  • वृषभ

या राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण नुकसानदायक सिद्ध होऊ शकते. व्यवहार करताना काळजी घ्यावी. अन्यथा नुकसान होऊ शकते. त्याचबरोबर नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांबरोबर मतभेद होऊ शकतात.

अतिशय कल्पक आणि बुद्धिमान असतात ‘या’ अक्षराने नाव सुरु होणाऱ्या व्यक्ती; मात्र एका गोष्टीत ठरतात अनलकी

  • कन्या

हे चंद्रग्रहण कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या नुकसानदायक ठरू शकते. या काळात आहार आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. काही महत्त्वाची कामे रखडू शकतात. तसेच, या काळात जोडीदाराबरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The last lunar eclipse in 2022 could be harmful for these three signs strong yoga for bitterness in relationship pvp
First published on: 30-10-2022 at 17:55 IST