Budh Planet Transit In Cancer: ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रह हा व्यवसाय, बुद्धिमत्ता, तर्कशक्ती, अर्थकारण आणि गणिताचा कारक मानला जातो. त्यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रह राशी बदलतो तेव्हा या क्षेत्रांवर त्याचा विशेष प्रभाव पडतो. तसेच राशींवरही त्याचा प्रभाव दिसून येतो. ग्रहांचा राजकुमार बुध ८ जुलै रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण ३ राशी अशा आहेत, ज्यांचा या काळात व्यवसायात नफा आणि करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत, ते जाणून घेऊया.

मिथुन रास (Mithun Zodiac)

बुधाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून दुसऱ्या स्थानी प्रवेश करणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. तसेच बुध लग्न आणि चतुर्थ स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात यश मिळू शकते. या काळात तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात तसेच तुमच्यासाठी नवीन धनलाभाचे स्त्रोतही निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याचा प्रभाव दिसू शकतो, ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होऊ शकतात.

कन्या रास (Kanya Zodiac)

बुध ग्रहाचे राशी परिवर्तन तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. कारण बुध तुमच्या गोचर कुंडलीच्या ११ व्या स्थानी भ्रमण करणार आहे. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच, जर तुम्ही कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असाल तर हा काळ तुमच्यासाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरु शकतो. तुम्हाला व्यवसायात अचानक फायदा होऊ शकतो आणि कोणत्याही जुन्या गुंतवणुकीचा फायदा मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर रास (Makar Zodiac)

हेही वाचा- शनी महाराज मार्गी होत तुम्हाला देणार अपार धन? ‘या’ ४ राशींना प्रेम व बँक बॅलन्स भरभरून लाभणार?

बुधाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून सातव्या स्थानी गोचर करणार आहे. तसेच बुध हा सहाव्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला कोर्ट-कचेरी प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. तसेच, या काळात तुम्ही भाग्यवान होऊ शकता. तुमच्या जीवनसाथीची प्रगती होऊ शकते. तसचे जर तुम्हाला भागीदारीचे एखादे काम सुरू करायचे असेल तर तुम्ही ते करू शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)