Rashi Bhavishya In Marathi, 2 May 2025 : २ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथी आहे. पंचमी तिथी सकाळी ९ वाजून १४ मिनिटांपर्यंत राहील. आर्द्रा नक्षत्र दुपारी १ वाजून ०३ मिनिटांपर्यंत जागृत असेल. रविवार पर्यंत धृती योग जुळून येईल. राहू काळ १०:३० वाजता सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असणार आहे. तर आज शुक्रवार तुमच्या राशीचा कसा जाणार आपण जाणून घेऊया…

२ मे पंचांग व राशिभविष्य (Daily Horoscope in Marathi, 2 May 2025)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope in Marathi)

सर्वांना गोडीने आपलेसे कराल. कामाचा ताण जाणवेल. कामातील दिरंगाई टाळण्याचा प्रयत्न करावा. मित्रांशी वाद वाढवू नयेत.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope in Marathi)

आपले विचार कौशल्याने मांडाल. तुमच्यातील चतुरता दिसून येईल. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. अचानक लाभ संभवतो.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope in Marathi)

मोठ्या लोकांचा सहवास लाभेल. कामात अधिकारी वर्गाची मदत मिळेल. भागिदारीतून चांगला लाभ संभवतो. कामात कसलीही कसूर करू नका. वातविकाराचा त्रास जाणवू शकतो.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope in Marathi)

स्त्रियांशी मैत्री कराल. खेळकरपणे दिवस घालवाल. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. कामाचा उरक वाढवावा लागेल. पोटाची किरकोळ तक्रार जाणवेल.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope in Marathi)

काही तडजोडी स्वीकाराव्या लागतील. कलेला योग्य दाद मिळेल. सामाजिक कामात सहभाग घ्याल. चटकन कोणावरही विश्वास ठेवू नका.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope in Marathi)

कौटुंबिक वातावरण चांगले राहील. कुशलपणे आपले मत पट‍वून द्याल. उगाच शिस्तीचा बडगा आमलात आणू नये. प्रवासाचा योग येईल. अपचनाचा त्रास संभवतो.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope in Marathi)

भावंडांची काळजी लागून राहील. भागीदारीत अधिकाराने वागाल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope in Marathi)

घरगुती प्रश्न चिघळू देवू नयेत. चांगला व्यावसायिक लाभ होईल. काहीसा मानसिक ताण जाणवेल. जोडीदाराचे बोलणे लाडिक वाटेल. चारचौघांत तुमचे कौतुक केले जाईल.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope in Marathii)

दिवस सत्कारणी लावाल. धार्मिक कामात सहभाग घ्याल. जवळचे नातेवाईक भेटतील. जुन्या प्रसंगांना उजाळा देण्यात येईल. प्रवास जपून करावा.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope in Marathi)

तुमच्या बोलण्याला धार येईल. मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार करणे अपरिहार्य आहे. तुमच्या जवळील ज्ञानाचा सदुपयोग होईल. आर्थिक गोष्टींचा पुनर्विचार करावा.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope in Marathi)

रागावर नियंत्रण ठेवा. अती महत्त्वाकांक्षा चांगली नाही. तुमच्यातील धाडस वाढीस लागेल. उत्साहाने कामे पूर्ण कराल. डोकेदुखीचा त्रास संभवतो.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope in Marathi)

डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. गैरसमजुतीमुळे त्रास संभवतो. कामातील चलबिचलता टाळावी. व्यावसायिक बाबींचा सखोल विचार करावा. जबाबदारी योग्य रीतीने पार पाडाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर