Dainik Rashi Bhavishya In Marathi, 11 August 2025: आज ११ ऑगस्ट २०२५ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. द्वितीया तिथी दुपारी १० वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल; त्यानंतर तृतीया तिथी सुरु होईल. रात्री ९ वाजून ३३ मिनिटांपर्यंत अतिगंड योग जुळून येईल. दुपारी १ वाजून १ मिनिटांपर्यंत शतभिषा नक्षत्र जागृत असणार आहे. आज राहू काळ ७:३० वाजता सुरु होईल ते ९ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे. आज भोलेनाथ तुमच्या राशीवर कृपेच छत्र धरणार का जाणून घेऊया…

११ ऑगस्ट २०२५ पंचांग व राशिभविष्य (Horoscope Today In Marathi, 11 August 2025)

मेष आजचे राशिभविष्य (Aries Horoscope Today in Marathi)

मन:स्वास्थ्य बिघडू देऊ नका. आजचा दिवस मध्यम फलदायी राहील. क्षुल्लक गोष्टींचा फार विचार करू नका. मुलांची काळजी लागून राहील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील.

वृषभ आजचे राशिभविष्य (Taurus Horoscope Today in Marathi)

ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी. आवडीची कामे करायला वेळ मिळेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. आपला मूड बिघडणार नाही याची काळजी घ्या.

मिथुन आजचे राशिभविष्य (Gemini Horoscope Today in Marathi)

अवास्तव चर्चा करू नका. सत्याची कास सोडू नका. मित्रांशी सुसंवाद साधावा. घरातील वातावरण हसते-खेळते ठेवाल. आपली हौस पूर्ण करून घ्याल.

कर्क आजचे राशिभविष्य (Cancer Horoscope Today in Marathi)

जोडीदाराच्या वर्तनाने ताण वाढू शकतो. सरसकट एकच विचार करू नका. हातातील कामात यश येईल. बदलांकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहावे. भावंडांची उत्तम साथ मिळेल.

सिंह आजचे राशिभविष्य (Leo Horoscope Today in Marathi)

बोलताना शब्दांचे वजन लक्षात घेऊन बोला. आपलेच मत खरे करायला जाऊ नका. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आवडते पदार्थ खायला मिळतील. गोड बोलून कामे साध्य करता येतील.

कन्या आजचे राशिभविष्य (Virgo Horoscope Today in Marathi)

अनावश्यक खर्चाला आवर घालावी लागेल. कागदपत्रे नीट तपासून घ्यावीत. जोडीदाराची बाजू जाणून घ्यावी. अंगीभूत कलेचे कौतुक केले जाईल. दिवसाचा उत्तरार्ध मजेत जाईल.

तूळ आजचे राशिभविष्य (Libra Horoscope Today in Marathi)

मानसिक तोल ढळू देऊ नका. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कलेच्या क्षेत्रात काहीतरी नवीन शिकायला मिळेल. जोडीदाराच्या मताला पुष्टी द्याल. काही तडजोडी कराव्या लागतील.

वृश्चिक आजचे राशिभविष्य (Scorpio Horoscope Today in Marathi)

मनातील इच्छेला अधिक प्राधान्य द्याल. कामात पळवाट शोधून चालणार नाही. दिवस संमिश्र राहील. पोटाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. व्यसनाच्या आहारी जाऊ नका.

धनू आजचे राशिभविष्य (Sagittarius Dainik Rashi Bhavishya In Marathi)

अनावश्यक सल्ले देऊ नका. मुलांच्या तक्रारी वाढू शकतात. त्यांची बाजू समजून घ्यावी लागेल. धार्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. जोडीदाराविषयी संभ्रम दूर होईल.

मकर आजचे राशिभविष्य (Capricorn Horoscope Today in Marathi)

संपूर्ण माहितीशिवाय वक्तव्य करू नका. उगाच जुन्या गोष्टीत उकरून काढत बसू नका. योग्य आहार घ्यावा. घरातील गोष्टी संयमाने हाताळाव्यात. शक्यतो वादविवादात पडू नका.

कुंभ आजचे राशिभविष्य (Aquarius Horoscope Today in Marathi)

नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील. उष्णतेचे त्रास संभवतात. कामात किरकोळ समस्या जाणवू शकतात. मनाची द्विधावस्था होऊ शकते. अति विचार करू नका.

मीन आजचे राशिभविष्य (Pisces Horoscope Today in Marathi)

चेष्टा जपून करावी. वेळ पाळणे खूप गरजेचे आहे. कौटुंबिक घडी सांभाळावी. आर्थिक बाबीत आततायीपणे वागू नका. बोलताना भडक शब्दांचा वापर करू नका.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर