Aajche Rashi Bhavishya 11 november 2025 : आज ११ नोव्हेंबर २०२५ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी असणार आहे. आज सिद्धी योग जुळून येईल आणि आश्लेषा नक्षत्र जागृत असणार आहे आणि शुक्ल योग सुद्धा जुळून येतो आहे. राहू काळ १२ वाजून ०४ मिनिटांनी सुरु होईल ते १ वाजून २५ मिनिटांपर्यंत असणार आहे. अभिजित मुहूर्त १२ वाजून ४३ मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत असणार आहे. तर तुमच्या राशीचा मंगळवार कसा जाणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५ (Horoscope Today 11 November 2025 In Marathi)
दैनिक मेष राशिभविष्य (Aries Daily Horoscope Today In Marathi)
व्यावसायिक क्षेत्रात उत्तम काळ. मनात चांगले विचार घोळत राहतील. दिनक्रम व्यस्त राहू शकेल. कोणत्याही वादापासून दूर राहावे. करियर मध्ये प्रगती करता येईल.
दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Daily Horoscope Today In Marathi)
प्रवासाचे योग येतील. आहाराची पथ्ये पाळा. नवीन ओळख लाभदायक ठरेल. एखाद्या महत्त्वाच्या विषयावर घरात चर्चा होईल. जोडीदाराची प्रगती होईल.
दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Daily Horoscope Today In Marathi)
नवीन व्यवसायासाठी सुसंधी सापडेल. नोकरदार वर्गाने कामाकडे विशेष लक्ष द्यावे. पराक्रमात वृद्धी होऊ शकेल. हित शत्रूंपासून सावध राहावे. आरोग्यात सुधारणा होईल.
दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Daily Horoscope Today In Marathi)
व्यावसायिक क्षेत्रात चलती दिसून येईल. मध्यम फलदायी दिवस. भविष्यातील योजनांवर काम करणे आवश्यक. मित्रांसोबत काळ व्यतीत कराल. फाजील आत्मविश्वास टाळावा.
दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Daily Horoscope Today In Marathi)
नवीन कामासाठी प्रवृत्त व्हाल. दुसर्यांच्या मदतीला धावून जाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील कलेला योग्य दाद मिळेल. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.
दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Daily Horoscope Today In Marathi)
व्यसनांना वेळीच आवर घाला. पैशाची उधळपट्टी होत नाही ना याची काळजी घ्या. उत्साहवर्धक दिवस असेल. बोलण्यातील माधुर्य जपाल. गायक मंडळींना चांगली प्रतिष्ठा लाभेल.
दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Daily Horoscope Today In Marathi)
सर्वांना गोडीने आपलेसे कराल. मित्रांशी पुन्हा नव्याने संबंध जुळतील. जोडीदाराशी नाते अधिक दृढ होईल. विवाहाची बोलणी पुढे सरकतील. आर्थिक पातळीवर दिवस चांगला जाईल.
दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Daily Horoscope Today In Marathi)
जुनी उधारी वसूल होईल. दिवस चांगला जाईल. जवळचा प्रवास घडेल. व्यवसाय वाढीचे प्रयत्न यशस्वी होऊ लागतील. एखाद्या कामाला खीळ बसू शकते.
दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Daily Horoscope Today In Marathi)
सामाजिक क्षेत्रात कौतुक केले जाईल. मनाप्रमाणे खरेदी करता येईल. नातेवाईक तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अनावश्यक खर्च वाढू शकतो. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळावी.
दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Daily Horoscope Today In Marathi)
आवश्यक असेल तरच आपले मत मांडावे. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतील. कामात जोडीदाराची साथ मिळेल. प्रवासात घाई करून चालणार नाही. आपल्या साठी काही वेळ राखून ठेवावा.
दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Daily Horoscope Today In Marathi)
मानसिक संतुलन राखावे. नवीन कामात तज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यावा. खर्चाचा पूर्ण अंदाज बांधावा. हातातील प्रकल्प पूर्णत्वास जाईल. चिकाटी सोडू नका.
दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Daily Horoscope Today In Marathi)
घरात धार्मिक कार्य घडेल. प्रगतीचे नवे दार खुले होईल. भावंडांसोबत नातेसंबंध सुधारतील. व्यवसायात प्रतिष्ठा वाढीस लागेल. नव्या योजनेत गुंतवणूक कराल.
ज्योतिषी विद्याधर करंदीकर
