Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणाऱ्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे १२ राशींचा दिवस आज कसा जाणार आहे त्याबद्दल आपण या लाईव्ह ब्लॉगमधून घेणार आहोत.

Live Updates

Horoscope Today Updates 02 August 2025: आजचे राशिभविष्य ०२ ऑगस्ट २०२५

16:17 (IST) 2 Aug 2025

'या' तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी, शुक्र-चंद्राचे नक्षत्र परिवर्तन करणार मालामाल, होणार भरपूर प्रगती

Shukra-Chandra Gochar 2025: पंचांगानुसार, १ ऑगस्ट २०२५ रोजी चंद्र सकाळी १२ वाजून ४१ मिनिटांनी स्वाती नक्षत्रामध्ये प्रवेश केला असून शुक्र ग्रहाने ३ वाजून ५१ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला. ...सविस्तर बातमी
14:48 (IST) 2 Aug 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope 2 August)

विनाकारण तोंडसुख नको. भावनिक ताण घेऊ नका. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी कराल.

13:15 (IST) 2 Aug 2025

१५ तासांनी 'या' ३ राशींचा शुभ काळ सुरू! धन लाभाची शक्यता तर कामाची होईल चर्चा, अडचणी आपोआप होतील दूर…

3 August Horoscope: ३ ऑगस्ट रोजी पहाटे ४:१६ वाजता सूर्य अश्लेशा नक्षत्रात प्रवेश करेल. सूर्याच्या या नक्षत्र बदलामुळे काही राशींना खूप शुभ परिणाम मिळणार आहेत. ...वाचा सविस्तर
12:08 (IST) 2 Aug 2025

पुढील १२ दिवस पैसाच पैसा; राहूचे नक्षत्र परिवर्तन देणार अचानक धनलाभ अन् व्यवसायात वाढ

Rahu Nakshatra Gochar 2025: पंचांगानुसार, १ ऑगस्ट रोजी राहूने आर्द्रा नक्षत्रात प्रवेश केला असून तो या नक्षत्रामध्ये १३ दिवस राहील. राहूच्या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ पाहायला मिळेल. ...सविस्तर बातमी
11:41 (IST) 2 Aug 2025

१२ ऑगस्टपासून 'या' ५ राशींचे सोन्याचे दिवस सुरू! गजलक्ष्मी राजयोगमुळे होईल मोठा आर्थिक फायदा, करिअरमध्ये प्रगती अन् धन लाभाच्या संधी

12 August Horoscope Shukr Guru Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी धन आणि ऐश्वर्याचा कारक शुक्र आणि समृद्धीचा कारक गुरु एकत्र येणार आहेत. या दोन ग्रहांच्या योगाने गजलक्ष्मी योग तयार होईल, जो ५ राशींसाठी खूप शुभ आणि भाग्यवर्धक ठरेल. ...वाचा सविस्तर
10:09 (IST) 2 Aug 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope 2 August)

सावध पवित्रा घ्यावा. संपूर्ण खात्री करूनच कामे करावीत. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या स्वरुपातील बदल लक्षात घ्यावेत. व्यापारात जोखीम घेताना सावध राहावे.

09:07 (IST) 2 Aug 2025

आज २ ऑगस्टला 'या' ५ राशींचं नशीब फळफळणार! पैशांची नवीन संधी तर मनातील इच्छा होतील पूर्ण, लोक करतील तुमचं कौतुक...

Horoscope august 2: वसुमान योग आणि शनी महाराजांच्या कृपेमुळे आजचा दिवस ५ राशींसाठी भाग्यशाली ठरेल. ...सविस्तर वाचा
08:50 (IST) 2 Aug 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope 2 August)

मध्यवर्ती भूमिका स्वीकारताना काळजी घ्या. वैचारिक गुंतागुंत टाळावी. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. घराची जुनी कामे निघू शकतात. तुमच्यातील कौशल्याचा वापर करावा.

07:48 (IST) 2 Aug 2025

१५ दिवसानंतर ग्रहांचा राजा करणार राशी परिवर्तन; 'या' तीन राशींचे नशीब फळफळणार अन् बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होणार

Surya Gochar 2025: ऑगस्टमध्ये सूर्य स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश नेहमीच शुभ मानला जातो. ...सविस्तर बातमी
07:13 (IST) 2 Aug 2025

मेष राशिभविष्य (Aries Horoscope 2 August)

खाण्या-पिण्याची योग्य पथ्ये पाळा. दिवस संमिश्र फलदायी. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. जुनी कामे मार्गी लागण्यास सुरुवात होईल. मानसिक क्षमता वाढीस लागेल. 

07:04 (IST) 2 Aug 2025

2 August 2025 Horoscope: ऑगस्टच्या पहिल्याच शनिवारी मनातील इच्छा होईल पूर्ण! 'या' राशींना कामात चांगला लाभ, वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य

2 August 2025 Horoscope in Marathi २ ऑगस्ट रोजी १२ राशींचा आजचा दिवस नेमका कसा जाणार आहे, ते जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी

 

Horoscope Today Live Updates 02 August 2025

Horoscope Today Live Updates 02 August 2025