Dainik Rashi Bhavishya Updates : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह एका विशिष्ट कालावधीत त्यांची राशी बदलतात. काही ग्रहांचा वेग कमी-जास्त असल्याने त्यांचा प्रभावसुद्धा कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दिसून येतो. येत्या नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचा राजकुमार बुध आणि धनदाता शुक्र यांची युती होणार आहे. ही युती तूळ राशीत होईल…

Live Updates

Horoscope Today in Marathi Live 30 July 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० जुलै २०२५

10:40 (IST) 31 Jul 2025

'या' तारखेला जन्मलेले लोक शनीदेवाच्या कृपेने होतात श्रीमंत! वयाच्या इतक्या वर्षी मिळतो भरपूर पैसा...

Shani Favourite Mulank: हे लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होतात. ...अधिक वाचा
10:40 (IST) 31 Jul 2025

'या' तारखेला जन्मलेले लोक शनीदेवाच्या कृपेने होतात श्रीमंत! वयाच्या इतक्या वर्षी मिळतो भरपूर पैसा...

Shani Favourite Mulank: हे लोक मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होतात. ...अधिक वाचा
16:30 (IST) 30 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

जोडीदाराकडून तुमची इच्छा पूर्ण होईल. जमिनीच्या कामात गुंतवणूक कराल. दैनंदिन कामात थोडासा बदल करून पहावा. समोर आलेली संधी ओळखा. आईशी वादाचे प्रसंग टाळावेत.

16:30 (IST) 30 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

गुंतवणूक करताना सावध राहावे. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. गुरूजनांचा आशीर्वाद लाभेल. मुलांच्या खोडकरपणाकडे लक्ष ठेवा. क्षुल्लक गोष्टींवरून नाराज होऊ नका.

16:24 (IST) 30 Jul 2025

Budh Shukra Yuti 2025: बुध अन् शुक्राची ५ वर्षांनंतर निर्माण होईल दुर्मिळ युती! दिवाळीमध्ये होईल पैशांचा पाऊस, तुमची रास आहे का यात?

Mercury Venus conjunction 2025 : या संयोगामुळे, ३ राशींना भरघोस नफा मिळण्याची शक्यता आहे. त्यांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. करिअरच्या प्रगतीतील अडथळे देखील दूर होऊ शकतात. त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. ...अधिक वाचा
13:42 (IST) 30 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

आरोग्य विषयक तक्रारी जाणवतील. जोडीदाराशी मतभेदाची शक्यता. दिवसभर कामाचा ताण राहील. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. नवीन कामाची योजना आखाल.

13:19 (IST) 30 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

नवीन कल्पना कृतीत आणाल. रागावर नियंत्रण ठेवा. संयमाने कामे करावीत. हातून शुभकार्य घडेल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील.

12:15 (IST) 30 Jul 2025

जुलैनंतर अचानक पैसा अन् करिअरमध्ये मोठं यश! मालिका राजयोग 'या' ३ राशींसाठी उघडेल भाग्याचं दार...

Malika Rajyog Benefits to Zodiac Sign: या योगामुळे १२ राशींमधील तीन राशींना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर मग, पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी. ...अधिक वाचा
12:03 (IST) 30 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

दिवसभर संयम बाळगावा लागेल. कामात दिवसभर गढून जाल. काही नवीन खरेदी करण्याची संधी लाभेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभाची शक्यता.

11:24 (IST) 30 Jul 2025

ऑगस्ट महिन्यात 'या' ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! अचानक धनलाभ तर करिअरमध्ये यश; सूर्य आणि केतूच्या महायुतीमुळे पालटणार नशीब

Surya Ketu Yuti Benefits: ही युती जवळपास १८ वर्षांनी होत आहे, त्यामुळे काही राशींच्या नशिबात चांगला बदल होऊ शकतो. ...सविस्तर वाचा
11:24 (IST) 30 Jul 2025

Janmashtami 2025 Date: १५ की १६ ऑगस्ट? श्रीकृष्ण जन्माष्टमी नेमकी कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि शुभ वेळ…

Krishna Janmashtami Date 2025: चला तर मग जाणून घेऊ या वर्षीची जन्माष्टमी नेमकी कधी आहे. तसेच त्याची तिथी आणि इतर माहिती… ...सविस्तर बातमी
11:23 (IST) 30 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

ज्येष्ठ मंडळींशी तारतम्यतेने वागा. स्वत:विषयीचा चुकीचा ग्रह काढून टाका. जुनी कामे पूर्ण करण्यावर भर द्या. वरिष्ठांच्या मर्जीचे पालन करा. अनावश्यक खर्च टाळा.

10:44 (IST) 30 Jul 2025

१७ दिवसानंतर सोनपावलांनी स्वराशीत सूर्य करणार प्रवेश; 'या' तीन राशींचे आयुष्य काही क्षणात बदलणार, गडगंज श्रीमंती लाभणार

Surya Transit In Leo: सूर्य लवकरच स्वराशी असलेल्या सिंह राशीत प्रवेश करील, सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश नेहमीच शुभ मानला जातो. ...सविस्तर वाचा
10:39 (IST) 30 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल. नातेवाईकांना मदत कराल. विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. योजनाबद्ध कामे करावीत. मनातील चुकीच्या कल्पना काढून टाका.

10:02 (IST) 30 Jul 2025

१ ऑगस्टची पहाट 'या' ४ राशींसाठी सुवर्णकाळ आणणार; 'या' राशींच्या व्यक्ती होणार गडगंज श्रीमंत, संपत्तीत होईल वाढ

August 2025 horoscope: या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासोबतच अनपेक्षित पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे. चला तर मग याॉऑगस्ट महिन्यातील भाग्यवान राशी कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात. ...सविस्तर वाचा
10:01 (IST) 30 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

मनातील इच्छा पूर्ण होईल. मैत्रीचे संबंध जपावेत. नवीन योजनांकडे बारीक लक्ष ठेवा. गुंतवणूक करताना फसवणुकीपासून सावध राहा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

09:43 (IST) 30 Jul 2025

August Horoscope: ऑगस्ट महिन्यात सणवार घेऊन येणार आनंदी-आनंद! बाप्पाच्या कृपने प्रत्येक राशीच्या आयुष्यात येणार मोठे वळण; वाचा तुमचे भविष्य

August Monthly Horoscope : कोणत्या राशीला कसा होणार फायदा याबद्दल ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांच्याकडून जाणून घेऊया… ...अधिक वाचा
09:16 (IST) 30 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

नवीन ओळखी होतील. हस्तकलेला वाव द्यावा. मानसिक संतुलन राखावे. भावंडांना मदत कराल. चांगले साहित्य वाचनात येईल.

08:08 (IST) 30 Jul 2025

बुध-शुक्राच्या युतीने 'हा' महिना ३ राशींसाठी ठरणार लकी? लक्ष्मी नारायण राजयोग बनल्याने होणार अचानक धनलाभ

Lakshmi Naryan Rajyog 2025 : काही ग्रहांचा वेग कमी जास्त असल्याने त्याचा प्रभाव सुद्धा कमी अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होतो... ...सविस्तर बातमी
07:56 (IST) 30 Jul 2025

Daily Horoscope: भगवान विष्णूच्या कृपेने 'या' राशींचे बदलणार नशीब; कोणाला महत्वाच्या कामात यश तर कोणच्या हातून घडेल शुभकार्य; वाचा राशिभविष्य

Dainik Rashi Bhavishya In Marathi, 30 July 2025: तर भगवान विष्णू तुमच्या राशीसाठी कोणते संकेत घेऊन आला आहे जाणून घेऊया... ...सविस्तर वाचा

आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० जुलै २०२५

<strong>आजचे राशिभविष्य लाईव्ह ३० जुलै २०२५</strong>