Dainik Rashibhavishya Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते. चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today Horoscope 18 May 2025: आजचे राशिभविष्य १८ मे २०२५

17:30 (IST) 18 May 2025

बिकट काळ संपणार! ८ जूनपासून बुधदेवाचा उदय 'या' राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख, पैसा आणणार? मिळणार ऐश्वर्य अन् धन-संपत्ती!

Budh Uday 2025: बुधाचा उदय काही राशीच्या लोकांना नोकरीपासून ते व्यवसायापर्यंत फक्त फायदेच फायदे देऊ शकतो. ...सविस्तर बातमी
16:38 (IST) 18 May 2025

तूळ राशिभविष्य (Libra Rashi Bhavishya in Marathi)

सासुरवाडीची मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारला जाईल. अचानक धनलाभ होईल. कामातून अनपेक्षित लाभ होईल. पत्नीची नाराजी दूर करावी.

15:58 (IST) 18 May 2025

कन्या राशिभविष्य (Virgo Rashi Bhavishya in Marathi)

मानसिक गोंधळाला बळी पडू नका. कौटुंबिक गोष्टीतून मार्ग काढता येईल. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. परोपकाराची जाणीव ठेवाल.

15:16 (IST) 18 May 2025

१२ महिन्यानंतर निर्माण होणार मालव्य आणि भद्र महापुरूष राजयोग; 'या' तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

Shukra-Budh Gochar 2025: शुक्र ग्रह वृषभ राशीत प्रवेश करून मालव्य राजयोग निर्माण करेल. तर बुध ग्रह स्वराशी असलेल्या मिथुन राशीत प्रवेश करेल. ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. ...वाचा सविस्तर
14:57 (IST) 18 May 2025

सिंह राशिभविष्य (Leo Rashi Bhavishya in Marathi)

कामानिमित्त प्रवास करावा लागेल. जोडीदाराची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल. हितशत्रूंचा विरोध मावळेल. हातातील कामात यश येईल.

13:31 (IST) 18 May 2025

कर्क राशिभविष्य (Cancer Rashi Bhavishya in Marathi)

अधिकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवीन संबंध प्रस्थापित केले जातील. जवळचे मित्र मंडळी भेटतील. उत्तम व्यावसायिक लाभ होईल.

13:03 (IST) 18 May 2025

Weekly Numerology Prediction: या आठवड्यात कोणत्या मूलांकाच्या लोकांना मिळेल आनंदाची बातमी अन् धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्र भविष्य

Weekly Numerology Prediction 19 To 25 May 2025 : १९ ते २५ मे या आठवड्यात, , ग्रहांचा अधिपती बुध, मेष राशी सोडून वृषभ राशीत प्रवेश करेल. ...सविस्तर वाचा
12:33 (IST) 18 May 2025

मिथुन राशिभविष्य (Gemini Rashi Bhavishya in Marathi)

पारदर्शीपणे वागणे ठेवा. झोपेची तक्रार जाणवेल. बाह्य गोष्टींचे आकर्षण वाढू शकते. मनातील निराशा दूर सारावी. फसवणुकीपासून सावध रहा.

11:30 (IST) 18 May 2025

वृषभ राशिभविष्य (Taurus Rashi Bhavishya in Marathi)

हौस मौज करण्यात खर्च वाढू शकतो. प्रत्येक गोष्टींचा उत्तम आस्वाद घ्याल. तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांवर चांगली छाप पडेल. सर्वांना लाघवीपणे आपलेसे कराल. आवडत्या कामात दिवस घालवाल.

10:42 (IST) 18 May 2025

पाच दिवसांनंतर 'या' राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; बुध गोचरमुळे होतील कोट्याधीश, जगतील राजासारखे जीवन

Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, बुध लवकरचं वृषभ राशीत गोचर करणार आहे, ज्यामुळे १२ पैकी ३ राशींच्या लोकांचे करिअर आणि व्यवसायात नशीब चमकू शकते. ...सविस्तर वाचा
10:40 (IST) 18 May 2025

Shani Vakri 2025 : शनी वक्री होताच 'या' राशींचे लोक होतील भरपूर श्रीमंत! १३ जुलैपासून कमवतील भरपूर पैसा, सुख अन् पद-प्रतिष्ठा

Shani Vakri 2025 : न्यायदेवता शनीदेव जुलै महिन्यात मीन राशीत वक्री होणार आहेत. शनीच्या वक्रगतीमुळे, कर्क राशीसह दोन राशींना नोकरी आणि व्यवसायात भरपूर फायदे मिळू शकतात. ...वाचा सविस्तर
10:18 (IST) 18 May 2025

मेष राशिभविष्य (Aries Rashi Bhavishya in Marathi)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. खर्चाचा आकडा निश्चित करा. मित्रांशी मतभेद संभवतात. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल.

09:11 (IST) 18 May 2025

तीन दिवसानंतर शनी-सूर्य करणार नुसती चांदी; त्रिएकादश योग 'या' तीन राशींचे आयुष्य बदलणार

Triekadashi Yog 2025: पंचांगानुसार, २० मे २०२५ सूर्य आणि शनी एकमेकांपासून ६० डिग्रीवर असतील. ज्यामुळे त्रिएकादश योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल. ...वाचा सविस्तर
07:29 (IST) 18 May 2025

Daily Horoscope: राहू-केतूच्या राशी परिवर्तनाचा तुमच्या राशीवर कसा होईल परिणाम? कोणाला होणार धनलाभ आणि कोणाला घ्यावी लागणार काळजी

Daily Horoscope in Marathi, 18 May 2025 : तर रविवार तुमच्या राशीसाठी कसा असणार आहे हे जाणून घेऊया... ...सविस्तर बातमी

Today Horoscope 18 May 2025