Horoscope Today In Marathi, 19 May 2025 : ज्योतिषशास्त्रामध्ये, ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा आधारे व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होणार्या प्रभावाचा अभ्यास केला जातो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव दिसून येईल तसेच अंकशास्त्र, चाणक्य नीति द्वारे व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयीचे आज आपण जाणून घेणार आहोत. ग्रह नक्षत्रांची स्थितीनुसार मे महिन्यातील हा आठवडा अत्यंत खास असणार आहे.
'मे' च्या शेवटी तयार रहा..३ ग्रहांची महायुती होताच 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा? लक्ष्मी कृपेने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
कर्क राशिभविष्य
मनातील भलते-सलते विचार बाजूला सारावेत. आनंदी दृष्टीने वागावे. ध्यानधारणा करावी लागेल. मन:शांती महत्त्वाची आहे हे लक्षात घ्या. उष्णतेचा त्रास जाणवेल.
मिथुन राशिभविष्य
फक्त स्वत:चा विचार करून चालणार नाही. नवीन गुंतवणूक कराल. सेवेचे महत्व लक्षात घ्यावे. इतरांच्या आनंदात सहभागी व्हावे. अघळपघळ गप्पा मारल्या जातील.
वृषभ राशिभविष्य
जोमाने कामे पूर्ण कराल. प्रवासाची आवड अंशत: पूर्ण होईल. चांगले साहित्य वाचनात येईल. वैचारिक दर्जा सुधारता येईल. मानसिक चांचल्य जाणवेल.
१९ मे २०२५ पंचांग व राशिभविष्य, मेष राशिभविष्य
उत्तम वाहन सौख्य लाभेल. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. झोपेची तक्रार दूर होईल. घरातील वातावरणात प्रसन्नता राहील. आवडी-निवडी बाबत ठाम राहाल.
साडेसाती व ढैय्यापासून होणार मुक्ती! शनिजयंतीपासून 'या' राशींना पैशाची कमतरता भासणार नाही? शनी महाराज देणार अच्छे दिन?
३० वर्षानंतर कर्मदात्याच्या मार्गी अवस्थेमुळे ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्णकाळ
शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील. दरम्यान, या काळात शनी मार्गी, वक्रीदेखील होतो. लवकरच शनी मार्गी होणार आहे, ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. सविस्तर वृत्त
‘या’ राशी कमावतील बक्कळ पैसा, चौफेर होईल धनलाभ?
बुधाचा मिथुन राशीत उदय होईल. बुध उदय काही राशींसाठी अत्यंत लाभदायक असणार आहे. बुध देवाच्या उदयाने या राशींच्या भाग्याचे दार उघडण्याची शक्यता आहे. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे जाणून घेऊया..