ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो किंवा इतर कोणत्याही ग्रहासोबत एका राशीत येतो. तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर होतो. मेष राशीमध्ये त्रिग्रही योग तयार झाला आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रात मंगळ हा धैर्य आणि पराक्रमाचा दाता मानला जातो. बुध, राहू आणि सूर्य हे तीन महत्त्वाचे ग्रह मेष राशीत आहेत. तसेच या तीन ग्रहांनी मिळून त्रिग्रही योग तयार झाला आहे. बुध ग्रहाने ८ एप्रिल रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे. तसेच १२ एप्रिल रोजी छाया ग्रह राहूने मेष राशीत प्रवेश केला आहे. त्याच वेळी, १४ एप्रिलपासून ग्रहांचा राजा सूर्य देखील मेष राशीत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीमध्ये या तीन ग्रहांच्या उपस्थितीमुळे त्रिग्रही योग तयार झाला आहे. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. परंतु अशा तीन राशी आहेत ज्यांना या संक्रमणातून चांगलं पाठबळ मिळेल, चला जाणून घेऊया कोणत्या आहेत राशी…
मिथुन: तुमच्या संक्रमण कुंडलीत अकराव्या भावात त्रिग्रही योग तयार झाला आहे. या स्थानाला उत्पन्नाचे स्थान म्हणतात. त्यामुळे तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तसेच उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायात गुंतवणुकीसाठीही हा काळ अनुकूल आहे.मिथुन राशीवर स्वतः बुधाचे अधिपत्य आहे. सूर्य आणि बुध यांच्यात मैत्रीची भावना आहे. त्यामुळे या योगातून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. मात्र, तुमच्या कुंडलीत राहू आणि सूर्य ग्रह कोणत्या स्थितीत आहेत हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
कर्क: त्रिग्रही योग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. कारण तुमच्या राशीतील दशम भावात त्रिग्रही योग झाला आहे. या स्थानाला करिअर आणि नोकरीचे घर म्हणतात. यावेळी तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. व्यवसायात लाभाचे योग आहेत. नवीन करार निश्चित होऊ शकतात. ज्याचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो. पण कुंडलीत राहू आणि सूर्याची स्थिती पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
Budh Gochar: २५ एप्रिलला बुध ग्रह करणार गोचर, या तीन राशींना मिळणार आर्थिक बळ
सिंह: तुमच्या राशीत नवव्या भावात त्रिग्रही योग तयार होत आहे. या स्थानाला भाग्यस्थान आणि परदेश प्रवासाचं स्थान म्हणतात. त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच दीर्घकाळ रखडलेली कामेही करता येतील. तुम्हाला व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. यावेळी स्पर्धक विद्यार्थ्यांनाही नशीब साथ देईल. सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे. त्यामुळे कुंडलीत सूर्य ग्रहाची स्थिती पाहणे अत्यंत आवश्यक आहे.