Vastu Rules for watering Tulsi Plant: तुळस ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येते. आपल्या धर्मात तुळशीला अत्यंत महत्व असून पवित्र आणि पूजनीय स्थान मिळाले आहे. तुळशी घरात ठेऊन त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि सकारात्मक बदल होतात, असे मानले जाते. हिंदूंच्या श्रद्धेनुसार तुळस ही अत्यंत शुभ मानली जाते. कारण, त्यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे, असं म्हटलं जातं. याशिवाय तुळस घरासाठी फायदेशीर मानली जाते. तुळस भरपूर ऑक्सिजन देणारी वनस्पती असल्याने ती आपल्यासाठी फारच उपयोगी आहे. तसेच आयुर्वेदात देखील तुळशीचे बहुगुणी उपयोग असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे तुळस ही आपल्या घरी असणं केव्हाही चांगलंच आहे.

तुळशीत लक्ष्मी मातेचं वास्तव्य असतं अशी आख्यायिका आहे. ज्या घरात तुळस सदाबहार फुललेली असते त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी असते, असं मानलं जातं. वास्तविक, धार्मिक मान्यतांनुसार, तुळशीबाबत काही विशेष नियम आणि खबरदारी सांगितली आहे. याचे पालन केल्याने भाग्य चमकते, असे मानलं जाते. वास्तुशास्त्रातही तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याबाबत काही नियम आहेत. या नियमनुसारच तुळशीला जल अर्पण करायचे असते. तुळशीला जल अर्पण करताना कोणत्या चुका करणे टाळावे, शास्त्रात काय सांगितलयं जाणून घेऊया…

(हे ही वाचा: Vastu Tips Calendar: घरात ‘या’ दिशेला कॅलेंडर लावल्याने नांदते सुख-समृद्धी? शास्त्रात काय सांगितलंय पहा जरा)

तुळशीला जल अर्पण करताना ‘या’ चुका टाळा!

१. शास्त्रानुसार, भगवान विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्याकडे तुळस असल्यास आंघोळ केल्याशिवाय कधीही पाणी अर्पण करू नये.

२. शास्त्रानुसार, तुळशीला जल अर्पण करण्यापूर्वी काहीही खाऊ नये.

३. पुराणात दिलेल्या वर्णनानुसार, तुळशीच्या रोपाला पाणी देताना इतर कपड्यांपेक्षा अंगावर फक्त वस्त्र असावे. म्हणजे शिलाई असलेल्या कपड्यांपेक्षा एकाच कापडातील वस्त्र असावे.

४. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, रविवारी तुळशीला जल अर्पण करू नये. पौराणिक मान्यतेनुसार, तुळशीमाता रविवारी भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते. रविवारी तुळशीला जल अर्पण केल्याने तुळशीचा उपवास मोडला जात असतो, त्यामुळे या दिवशी पाणी टाकू नये.

५. एकादशीला तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये, अशी धार्मिक मान्यता आहे. असे मानले जाते की, एकादशीच्या दिवशी तुळशीमाता भगवान विष्णूसाठी निर्जला व्रत करते, त्यामुळे एकादशीला तुळशीला पाणी देणे टाळावे, असे मानले जाते.

६. तुळशीच्या रोपाला जास्त पाणी अर्पण करू नये. असे केल्याने तुळशीच्या रोपाची मुळे कुजतात. यामुळे तुळशीचे रोप सुकते आणि घरामध्ये तुळशीचे रोप सुकणे चांगले मानले जात नाही. 

७. धार्मिक मान्यतांनुसार, तुळशीला पाणी देण्यासाठी सर्वात योग्य वेळ सूर्योदयाची आहे. सूर्योदयाच्या वेळी तुळशीला पाणी दिल्याने विशेष लाभ होतो आणि आर्थिक संकटातून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)