Shukra-Ketu Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन होते, ज्याचा प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागतो. केतू ३० ऑक्टोबर २०२३ पासून कन्या राशीत विराजमान असून तो २०२४ मध्येही याच राशीत राहील. तसेच ऑगस्ट महिन्यात धन-संपत्तीचा कारक ग्रह शुक्र कन्या राशीत प्रवेश करील.

पंचांगानुसार, २५ ऑगस्ट रोजी शुक्र ग्रह सिंह राशीतून दुपारी १ वाजून २४ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश करेल आणि १८ सप्टेंबरपर्यंत शुक्र याच राशीत राहील. ज्यामुळे शुक्र आणि केतू ग्रह एकत्र येतील. या दोन ग्रहांच्या एकत्र येण्याने काही राशीच्या व्यक्तींना त्याचा शुभ परिणाम पाहायला मिळेल.

शुक्र-केतू येणार एकत्र तीन राशींना होणार फायदा (Shukra-Ketu Yuti 2024)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना शुक्र-केतूच्या एकत्र येण्याने शुभ परिणाम पाहायल मिळतील. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. करिअरमध्ये मेहनतीच्या जोरावर यश मिळवाल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील. धन, सुख-समृद्धीत वाढ होईल. भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. दूरचे प्रवास घडतील.

सिंह

शुक्र-केतूची युती सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. भावंडांबरोबरचे संबंध मजबूत होतील. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल, कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण असेल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी देखील शुक्र-केतूची युती खूप प्रभावशाली असेल. या काळात अडकलेले पैसे मिळतील. आध्यात्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. मानसिक तणाव दूर होईल. अनेक सुख-सुविधा प्राप्त होतील. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंध चांगले होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल.

हेही वाचा: सप्टेंबरमध्ये कमावणार बक्कळ पैसा; सूर्य-केतूच्या प्रभावाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार

तूळ

शुक्र-केतूची युती तूळ राशीच्या व्यक्तींना देखील अनेक सकारात्मक परिणाम देणारी ठरेल. या काळात कर्ज मुक्ती होण्यात मदत होईल. धनप्राप्ती होईल. वैवाहिक आयुष्यात गैरसमज दूर होतील. व्यवसायात वाढ होईल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. भाग्याची साथ मिळेल, कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)