September Grah Gochar 2025: ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सप्टेंबर महिना खूप महत्त्वाचा असू शकतो. या महिन्यात अनेक मोठे ग्रह त्यांच्या राशी तसेच नक्षत्रांमध्ये बदल करतील, ज्याचा परिणाम १२ राशी तसेच देश आणि जगात दिसून येईल. सप्टेंबर महिन्यातील ग्रहांच्या स्थितीबाबत १३ सप्टेंबर रोजी मंगळ कन्या राशी सोडून तूळ राशीत प्रवेश करेल. याशिवाय, तो चित्रा आणि स्वाती नक्षत्रात राहील. याशिवाय, या महिन्यात सूर्य, बुध आणि शुक्र देखील नक्षत्रांसह त्यांच्या राशी बदलतील. अशा परिस्थितीत, हा महिना अनेक राशींच्या लोकांसाठी चांगला असू शकतो, तर काही राशींच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात कोणत्या राशींना भाग्य मिळू शकते ते जाणून घेऊया…

सप्टेंबर महिन्यात ग्रह गोचर

१३ सप्टेंबरला मंगळाचे कन्या आणि तूळ राशीमध्ये विराजमान असेल. ग्रहांचा राजा सूर्य १७ सप्टेंबरला सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करेल. याचबरोबर सूर्य पूर्वा फाल्गूणी नक्षत्रात, उत्तरा फाल्गनी आणि हस्त नक्षत्रात विराजनाम असेल. अशा स्थितीमध्ये बूधसह बुधादित्य योग निर्माण होईल.

महिन्यात बुध सिंह आणि कन्या राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे सूर्याशी युती होऊन बुधादित्य योग निर्माण होईल. याशिवाय, बुध माघ, पूर्वाफाल्गुनी, उत्तराफाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्रांमध्ये राहील.

राक्षसांचा गुरु शुक्र कर्क, सिंह आणि आश्लेषा, माघ, पूर्वाफाल्गुनी नक्षत्रांमध्ये राहील. याशिवाय, बृहस्पती मिथुन आणि पुनर्वसु नक्षत्रात राहील.

कर्माचा कर्ता शनी मीन राशीत प्रतिगामी अवस्थेत राहील. याशिवाय, शनि उत्तरा भाद्रपदात राहील.

पापी ग्रह केतू सिंह राशीत विराजमान असण्यासह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात राहील आणि राहू बद्दल कुंभ राशीत असण्यासह पूर्वाभाद्रपद नक्षत्रात राहील.

सप्टेंबर महिन्यात या राशी ठरतील भाग्यशाली (Lucky Zodiac Sign September 2025)

मेष राशी (Aries Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना खूप खास राहणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. मंगळ तूळ राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास वाढू शकतो. तुम्ही कुटुंबासह चांगला वेळ घालवू शकता. समाजात आदर वाढू शकतो. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. चांगल्या परिणामांसाठी प्रवाळ घाला आणि हनुमानाची पूजा करा.

मिथुन राशी (Gemini Zodiac)

या राशीच्या लग्न घरामध्ये गुरू बृहस्पती विराजमान आहे. यासह बुध ग्रह कन्या राशीमध्ये विराजमान झाल्याने भद्र नावाचा महापुरुष राजयोग निर्माण होतो. अशा स्थितीमध्ये या राशीचे लोकांना खूप फायदा मिळू शकतो. भौतिक सुखामध्ये वाढ होईल तसेच मान-सन्मान वाढेल. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप फायदा मिळू शकतो. वाहन, घर, जमीन इत्यादी घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना खूप फायदा मिळू शकतो. शुभ फळ मिळवण्यासाठी पन्ना रत्न परिधान करावा. याशिवाय हिरव्या वस्तूंचे दान करावे.

कर्क राशी (Cancer Zodiac)

या राशीसाछी सप्टेंबर महिना कित्येत क्षेत्रामध्ये सकारात्मक प्रभाव टाकू शकतो. या राशीचा स्वामी चंद्र कोणत्या ना कोणत्या ग्रहाबरोबर युती करण्यासाठी शुभ योगांचा निर्माण करेल ज्यामुळे तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. त्यासाठी सूर्य बुधची युती निर्माण होईल ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होईल. ज्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा फायदा होईल. राजकारणसंबधीत विशेष लाभ मिळू शकतो.

या शिवाय सिंह, तूळ, धनु राशीच्या लोकांना नोकरी, व्यवसायामध्ये विशेष फायदा मिळू शकतो.