When is Vinayak Chaturthi May 2025 : हिंदू धर्मात विनायक चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. विनायक चतुर्थीला जी व्यक्ती उपवास करते, गणपती बाप्पाची पूजा करते, तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सर्व संकटांपासून तिची मुक्ततासुद्धा होते. पण, अनेकांना प्रश्न पडला आहे की, मे महिन्याची विनायक चतुर्थी कधी आहे? यादिवशी कोणता शुभ योग जुळून येणार आहे? त्याबद्दल जाणून घेऊ…

तर ३० मे २०२५ रोजी विनायक चतुर्थी साजरी केली जाणार आहे. या दिवशी दोन विशेष योग तयार होत आहेत, ज्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले आहे. चला तर विनायक चतुर्थीच्या पूजेची तारीख आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया…

ज्येष्ठ विनायक चतुर्थी तिथी २०२५ (Vinayak Chaturthi May 2025)

पंचांगानुसार, ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी तिथी २९ मे रोजी रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल आणि ३० मे रोजी रात्री ९ वाजून २१ मिनिटांपर्यंत राहील, त्यामुळे उदयतिथीच्या आधारे ३० मे २०२५ रोजी शुक्रवारी विनायक चतुर्थी व्रत केले जाईल.

विनायक चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त ( Vinayak Chaturthi Shubha Muhurta)

विनायक चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त १० वाजून ५५ मिनिटांपासून सुरू होईल, तो दुपारी १ वाजून ४१ मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळी ज्येष्ठ विनायक चतुर्थीची पूजा करावी. विनायक चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग आणि रवियोग जुळून येतो आहे.

हेही वाचा

विनायक चतुर्थी व्रताचे महत्त्व (Vinayak Chaturthi Importance)

विनायक चतुर्थीचे व्रत केल्याने भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळतो. याबरोबरच गणपती बाप्पाच्या कृपेने आयुष्यातील समस्या, अडथळे, अडचणी दूर होतात आणि शुभफळ मिळते आणि आर्थिक स्थिती, चांगले आरोग्य प्राप्त होते.

त्याचबरोबर विनायक चतुर्थी असल्यामुळे ज्योतिषांच्या मते, ३० मे हा दिवस खूप शुभ आहे. या शुभ प्रसंगी, गुरु नक्षत्र परिवर्तनसुद्धा करणार आहे. यामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात नवे बदल होणार आहेत.

गुरु नक्षत्र गोचर २०२५ (Guru Nakshatra Gochar 2025)

ज्योतिषांच्या मते, देवगुरू गुरु ३० मे रोजी नक्षत्र बदलणार आहे. ३० मे रोजी सकाळी ५ वाजून २६ मिनिटांनी गुरु मृगशिरा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात संक्रमण करेल. देवगुरु गुरुच्या नक्षत्र चरणातील बदलामुळे दोन राशींच्या लोकांना फायदा होईल.

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांच्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. गुरुच्या कृपेने बिघडलेले काम पूर्ण होईल आणि सरकारी यंत्रणेकडून पैशाचा फायदा होईल. आदर वाढेल, न्यायालयीन क्षेत्रातही काम करण्याची संधी चालून येईल. तुम्हाला मोठी जबाबदारी मिळेल आणि काळानुसार आदर, संपत्ती, मालमत्ता वाढेल. व्यवसायाशी संबंधित लोकांनाही लाभ मिळू शकतो. धार्मिक प्रवासाची आणि सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. फक्त तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिथुन

सध्या देवगुरु गुरु मिथुन राशीत आहे. येत्या काळात मृगशिरा नक्षत्राच्या शेवटच्या टप्प्यात गुरु ग्रह भ्रमण करेल, यामुळे मिथुन राशीच्या लोकांना जीवनात लाभ मिळू शकतात. आरोग्य चांगले राहील, स्वभावात नम्रता दिसेल; यामुळे बिघडलेली कामे पूर्ण होतील. पिकनिकची योजना किंवा कुटुंबासह धार्मिक सहलीला जाल. दानधर्मात रस वाढेल, पण लोभ टाळावा लागेल. तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल. सरकारी व्यवस्थेतून आर्थिक लाभ होतील. तुम्हाला राजेशाही आनंदही मिळेल.