Ashadh Month Vinayak Chaturthi 2022 Date and Shubh Muhurat: आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत पाळले जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील दोन्ही पक्षांची चतुर्थी तिथी गणपतीला समर्पित आहे. ज्येष्ठ विनायक चतुर्थी व्रत ३ जुलै रोजी रविवारी आहे. कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीचा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो.

सध्या आषाढ महिना सुरू असून आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत असेल. आषाढ महिन्याची विनायक चतुर्थी ३ जुलै रोजी आहे. या दिवशी गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते.

आणखी वाचा : राहू-मंगळ युती: ‘या’ राशींच्या व्यक्तींनी काळजी घ्या! अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात

गणपती हे सर्व देवतांचे आद्य उपासक असून ते शुभतेचे प्रतीकही आहेत. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करून उपवास केल्याने बुद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.

विनायक चतुर्थी शुभ मुहूर्त

आषाढ शुक्ल चतुर्थीचा प्रारंभ: ०२ जुलै, शनिवार दुपारी ३:१६
आषाढ शुक्ल चतुर्थी तिथीची समाप्ती: ०३ जुलै, रविवार संध्याकाळी ०५:०६ पर्यंत
गणेश पूजेचा शुभ मुहूर्त: ३ जुलै रोजी सकाळी ११.०२ ते दुपारी ०१.४९ पर्यंत
चंद्रोदयाची वेळ: सकाळी ९ वाजता
चंद्रास्त: ३ जुलै रात्री १०.३३ वाजता
रवि योग: ३ जुलै सकाळी ०५.२८ ते ४ जुलै सकाळी ०६.३०
सिद्धी योग: ३ जुलै दुपारी १२.०७ ते ४ जुलै रात्री १२.२१

आणखी वाचा : Budh Gochar 2022: बुद्धी दाता बुधाने राशी बदलली, ‘या’ राशींच्या अडचणी वाढू शकतात!

विनायक चतुर्थीला गणेशाची अशी पूजा करा

या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर स्वच्छ लाल किंवा पिवळे कपडे घाला. आता पूजास्थळी जाऊन चौकी, पाटा किंवा पूजागृहातच पिवळ्या किंवा लाल कापडाचे स्वच्छ कापड लावून गणेशाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. गणपतीला जलाभिषेक करावा. आता देवाला फुले, हार, ११ किंवा २१ गाठी दुर्वा अर्पण करा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीगणेशाला सिंदूर टिळक लावा. आता गणपतीला मोदक किंवा बुंदीचे लाडू अर्पण करा. शेवटी आरती वगैरे करून प्रसाद वाटप करावा. दिवसभर फलाहारी व्रत पाळल्यानंतर पंचमी तिथीला उपवास सोडावा.