Daily Horoscope In Marathi, 1 May 2025 : १ मे २०२५ रोजी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. चतुर्थी तिथी सकाळी ११ वाजून २४ मिनिटांपर्यंत राहील. मृगशिरा नक्षत्र दुपारी २ वाजून २१ मिनिटांपर्यंत जागृत असेल. शनिवारी सकाळी ५ वाजून ३९ मिनिटांपर्यंत सुकर्मा योग जुळून येईल. राहू काळ १:३० वाजता सुरु होईल ते ३ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच आज विनायक चतुर्थी असणार आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी बाप्पा तुम्हाला कसा आशीर्वाद देणार हे आपण जाणून घेऊया…

१ मे पंचांग व राशिभविष्य (Dainik Rashi Bhavishya In Marathi, 1 May 2025)

दैनिक मेष राशिभविष्य (Aries Horoscope Today In Marathi)

आत्मविश्वास वाढीस लागेल. ठामपणे विचार नोंदवाल. मैत्रीतील दुरावा वाढू देवू नये. नवीन संधीकडे लक्ष द्यावे. सढळ हाताने मदत कराल.

दैनिक वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope Today In Marathi)

गप्पा गोष्टींमधून विनोद निर्मिती कराल. गोड बोलून सर्वांना आपलेसे कराल. कलेला पोषक वातावरण लाभेल. अचानक धनलाभ संभवतो. उत्तम विचार मांडाल.

दैनिक मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope Today In Marathi)

काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. क्षणिक सौख्याने हुरळून जाऊ नका. जोडीदाराविषयी गैरसमज नकोत. कामातील क्षुल्लक चुका दुरूस्त करा. वरिष्ठांची मर्जी राखावी.

दैनिक कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope Today In Marathi)

नवीन मैत्रीचे संबंध जुळून येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामाच्या ठिकाणी हयगय करू नका. क्षुल्लक गोष्टींमुळे मनस्ताप संभवतो. जोडीदाराच्या वागण्याचा शांतपणे विचार करावा.

दैनिक सिंह राशिभविष्य (Leo Horoscope Today In Marathi)

वादाचे मुद्दे टाळण्याचा प्रयत्न करावा. आलेली संधी सोडू नका. मुलांच्या समस्या समजून घ्याव्यात. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

दैनिक कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope Today In Marathi)

घरगुती समस्या दूर कराव्यात. विरोधाला बळी पडू नका. चांगल्या संगतीत रमून जाल. नवे अनुभव गाठीशी  बांधाल. वडीलधार्‍यांचा आशीर्वाद लाभेल.

दैनिक तूळ राशिभविष्य (Libra Horoscope Today In Marathi)

मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. प्रवासात क्षुल्लक अडचण येऊ शकते. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. भागीदारीतील लाभाकडे काटेकोरपणे लक्ष द्या. कष्ट करण्यास मागे पुढे पाहू नका.

दैनिक वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope Today In Marathi)

नातेवाईकांचा विरोध वाढू शकतो. उत्साहाने कामे हाती घ्यावीत. खाण्या पिण्याची पथ्ये पाळावीत. उष्णतेचे विकार बळावू शकतात कौटुंबिक बाबींमध्ये विशेष लक्ष घालावे.

दैनिक धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope Today In Marathi)

स्वभावातील  हट्टीपणा कमी करण्याचा प्रयत्न करावा. हाताखालील लोक विश्वासू मिळतील. कामे मनाजोगी पार पडतील. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात गुंतून पडाल.

दैनिक मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope Today In Marathi)

मानसिक स्थैर्य जपावे. सामाजिक गोष्टींचे भान राखावे. फसवणुकीपासून सावध राहावे. घराबाहेर वावरतांना सतर्क राहा. बोलताना सारासार विचार करावा.

दैनिक कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope Today In Marathi)

किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. अहंभावनेने कामे करू नयेत. स्वत:च्या इच्छेला अधिक महत्त्व द्याल. आततायी  वागणे  टाळावे. नवीन मित्र जोडण्याचा प्रयत्न करावा.

दैनिक मीन राशिभविष्य (Pisces Horoscope Today In Marathi)

काही खर्च अचानक सामोरी येतील. घरातील कामासाठी वेळ काढाल. व्यावसायिक गोष्टींचे भान राखावे. हातातील कलेसाठी वेळ काढावा. मनातील वैर भावना काढून टाकावी.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर