Mercury Transit 15 September 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं जातं. चंद्रानंतर सर्वात वेगाने राशी बदलणारा ग्रह म्हणजे बुध. दररोजच्या विचारांवर, बुद्धीवर, संवादावर आणि व्यापारावर त्याचा थेट परिणाम होतो. आता संपूर्ण वर्षभरानंतर म्हणजेच १५ सप्टेंबरला बुध ग्रह स्वतःच्या स्वराशीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. हा बदल सर्व राशींवर परिणाम करेल; पण विशेषतः ३ राशींवर त्याचा सुवर्णकाळाचा आशीर्वाद पडणार असल्याचं ज्योतिष सांगतं. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…
बुधदेव स्वतःच्या घरात! ‘या’ राशींवर धनवर्षाव होणार?
कन्या – करिअर आणि वैवाहिक आयुष्यात सुखाचा वर्षाव
कन्या राशीसाठी बुधाचा हा गोचर अतिशय शुभ मानला जातो. बुधदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना कामकाजात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना व्यवसाय विस्ताराची सुवर्णसंधी मिळू शकेल. विवाह झालेल्या व्यक्तींना नात्यात गोडवा आणि सौख्य लाभेल. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना मानसिक शांती आणि सहकाऱ्यांचे उत्तम नाते लाभेल. या काळात कन्या राशीवाल्यांसाठी करिअर, वैवाहिक जीवन आणि आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू होऊ शकतो.
मकर – भाग्योदय आणि प्रवासाचे योग
मकर राशीच्या लोकांसाठी बुध ग्रह भाग्यस्थानात गोचर करत आहेत, यामुळे भाग्योदयाचे दरवाजे उघडू शकतात. धर्म, अध्यात्म आणि यात्रेत रस वाढेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे. नवे प्रकल्प यशस्वी होतील, तसेच बचतीतही वाढ होऊ शकते. नोकरी-व्यवसायात अपेक्षित प्रगती होऊ शकते. मकर राशीवाल्यांसाठी हा काळ प्रवास, धार्मिक कार्य आणि भाग्योदयाने परिपूर्ण असेल.
मिथुन – नाव, यश आणि भौतिक सुखांची प्राप्ती
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायी आहे. बुध ग्रह तुमच्या चतुर्थ भावात स्थान घेणार असल्याने अनेक संधी तुमच्यासमोर येऊ शकतात. घरगुती सुख-सुविधा वाढू शकतात. कार्यक्षेत्रात तुमची रचनात्मकता व नेतृत्वगुणांची प्रशंसा होऊ शकते. नवी जबाबदारी व बढतीची शक्यता आहे. कला, संगीत, बँकिंग, अध्यापन आणि प्रॉपर्टीशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतो. या काळात मिथुन राशीवाल्यांना समाजात मान-सन्मान, करिअरमध्ये उंच भरारी आणि भौतिक सुखांची अनुभूती मिळेल.
१५ सप्टेंबरनंतर बुध ग्रहाचा हा स्वराशी प्रवेश म्हणजेच कन्या, मकर आणि मिथुन राशींच्या लोकांसाठी भाग्य खुलवणारा काळ ठरणार आहे. आकस्मिक धनलाभ, करिअरमध्ये प्रगती आणि वैवाहिक जीवनात आनंद; यामुळे या राशींचं नशीब खरंच झळाळून उठू शकतं.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून, ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)