Silver Jewellery Benefits: भारतीय संस्कृतीत पूर्वीपासूनच सोन्यासह चांदीचे दागिनेदेखील मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पूर्वी स्त्रिया पायात नेहमी पैंजण, जोडवी घालायच्या तसेच तरुण मुलीदेखील चांदीचे विविध दागिने वापरायच्या. परंतु, हल्लीच्या बदलत्या फॅशनमुळे सण-समारंभ सोडल्यास कोणीही आवर्जून हे दागिने वापरत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, चांदीचे दागिने वापरल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होण्यास मदत मिळते.
चांदीच्या दागिण्यांमुळे ‘हे’ दोन ग्रह होतात मजबूत
ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की, प्रत्येक धातूवर कुठल्यातरी विशिष्ट ग्रहाचे प्रभुत्व असते; त्यानुसार चांदीवर चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांचे प्रभुत्व असते. त्यामुळे चांदीच्या नियमित वापराने कुंडलीतील चंद्र आणि शुक्र ग्रह मजबूत होण्यास मदत मिळते.
मानसिक ताण दूर होतो
कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होतो, तेव्हा त्याच्या प्रभावाने व्यक्तीच्या आयुष्यातील मानसिक तणाव, अशांती, नकारात्मकता, वाईट विचार दूर होण्यास मदत होते.
वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात
जेव्हा कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत होतो तेव्हा व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, पैसा आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्यास मदत मिळते.
आरोग्यासाठीही फायदेशीर
ग्रहांच्या शुभ परिणामांव्यतिरिक्त चांदीचे दागिणे घातल्याने शरीराचे तापमान नियंत्रणात राहते. ज्या व्यक्तींना उष्णतेचा खूप त्रास होतो, त्यांच्यासाठी चांदी खूप फायदेशीर ठरू शकते. शिवाय चांदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून आपल्याला दूर ठेऊ शकतात.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)