Rahu Gochar : प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर त्याचे राशी परिवर्तन करताना दिसतात. प्रत्येक ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा राशीचक्रातील १२ राशींवर चांगला आणि वाईट परिणाम दिसून येतो.. राहु कोणत्याही राशीमध्ये १८ महिने किंवा दिड वर्षांपर्यंत राहू शकतो. त्यानंतर तो दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. राहु ग्रह अशुभ मानला जातो. हा ग्रह खूप हळूवार चालतो. राहु ग्रह ज्या राशीमध्ये असतो त्या राशीवर त्याचा प्रभाव दिसून येतो.
राहू सध्या मीन राशीमध्ये विराजमान आहे. राहूने मीन राशीमध्ये ३० ऑक्टोबर २०२३ रोजी गोचर केले होते. आता राहू १८ मे २०२५ मध्ये नव्या राशीमध्ये गोचर करतील. राहू शनि राशीची रास कुंभ राशीमध्ये विराजमान होईल. (when will be rahu transit this zodiac signs have to be careful)
राहु आणि केतु दोन्ही उलट चाल चालणारे ग्रह आहे. राहुच्या नकारात्मक प्रभावामुळे व्यक्तीच्या आयुष्यावर याचा दुष्परिणाम दिसून येतो. व्यक्तीच्या जीवनात भरपूर समस्या येतात. राहुच्या प्रभावामुळे व्यक्ती राजाहून गरीबही होऊ शकतो.
राहुच्या दुष्परिणामामुळे २०२५ मध्ये कुंभ राशीला सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. शनिच्या राशीमध्ये राहु गोचर काही गोष्टींसाठी उत्तम राहील. शनि आणि राहू मित्र आहेत. शनि आणि राहु प्रेमामध्ये अपयश आणि मित्रताकडे घेऊन जाईल. कुटुंबात नात्यांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकततात पण कुंभ राशीच्या लोकांवर राहु गोचरचा परिणाम दिसून येईल. जाणून घेऊ या सविस्तर.
कुंभ राशी
कुंभ राशीवर राहुचा परिणाम दिसून येईल. कुंभ राशीला याचा सामना करावा लागू शकतो. कुंभ राशीच्या लोकांना २०२५ मध्ये राहू गोचरपासून काळजी घेणे आवश्यक आहे. २०२५ मध्ये राहू गोचर कुंभ राशीमध्ये असेन.कुंभ राशीच्या लोकांना आयुष्यात चढ उतार दिसून येईल. व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल ज्याचे फळ उशीरा मिळेल. टेन्शन, तणाव या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य आणि झोप न येण्याचा आजार निर्माण होऊ शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)