scorecardresearch

Pitru Paksha Shradh 2022: पितृपक्ष कधी सुरू होईल? तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा जाणून घ्या

पितृपक्षाला हिंदू धर्मात विशेष असं महत्व आहे. त्यामुळे पितरांचे श्राद्ध विधिपूर्वक करावे.

Pitru Paksha Shradh 2022
पितृपक्ष २०२२( फोटो: प्रातिनिधिक)

Pitru Paksha Shradh 2022: पितृ पक्षाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. पितृ पक्ष किंवा श्राद्ध सुमारे १६ दिवस चालते. पितृ पक्षात पूर्वजांची पूजा विधीपूर्वक केली जाते. पितृपक्षात पूजा केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. यावेळी पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी श्राद्ध तसंच पिंड दान केले जाते. पितृपक्ष घालण्याच्या काही विशिष्ट दिवस असतात. त्याच वेळी हे पितृपक्ष घालावे लागते. खरं तर, याची सुरुवात भाद्रपद महिन्यात होते. तर जाणून घेऊया यावेळी पितृपक्ष कधी सुरू होईल? आणि तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील.

पितृ पक्ष २०२२ प्रारंभ तारीख आणि वेळ कधी आहे?

हिंदू कॅलेंडरनुसार, पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी सुरू होतो. आश्विन महिन्यातील अमावास्येला तो संपते. यावर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबर २०२२ शनिवारपासून सुरू होणार आहे आणि पितृ पक्ष २५ सप्टेंबर २०२२ रोजी संपेल. हा दिवस अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या आहे.

( हे ही वाचा: मनी प्लांटशी संबंधित ‘हे’ उपाय करतील सुख-समृद्धीची भरभराट; जाणून घ्या)

पितृपक्षाचे महत्त्व

पितृपक्षात पितरांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंड दान केले जाते. पितृपक्षात पितरांच्या श्राद्धाच्या दिवशी कावळ्यांना अन्नदान करण्याची परंपरा आहे. शास्त्रानुसार कावळ्यांद्वारे पितरांपर्यंत अन्न पोहोचते. असे मानले जाते की पितृ पक्षामध्ये पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात. या वर्षी श्राद्धाची तारीख १७ सप्टेंबर २०२२ रोजी आली नाहीये. तर जाणून घेऊया पितृपक्षाच्या तारखांबद्दल.

श्राद्धाच्या तारखा

 • १० सप्टेंबर – पौर्णिमा श्राद्ध (शुक्ल पौर्णिमा), प्रतिपदा श्राद्ध (कृष्ण प्रतिपदा)
 • ११ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण द्वितीया
 • १२ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण तृतीया
 • १३ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण चतुर्थी
 • १४ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण पंचमी
 • १५ सप्टेंबर – अश्विन, कृष्णा
 • १६ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण सप्तमी
 • १८ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण अष्टमी
 • १९ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण नवमी
 • २० सप्टेंबर – अश्विन, कृष्ण दशमी
 • २१ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण एकादशी
 • २२ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण द्वादशी
 • २३ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण त्रयोदशी
 • २४ सप्टेंबर सप्टेंबर – अश्विन, कृष्ण चतुर्दशी
 • २५ सप्टेंबर – अश्विन, कृष्ण अमावस्या

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When will pitru paksha start find out the dates of shraddha gps

ताज्या बातम्या