Astrology And Anger Control : सतत दुसऱ्यांवर ओरडणारे, छोट्या-छोट्या गोष्टीत चिडचिड करणे असा स्वभाव बऱ्याच जणांना असतो. काही जणांचा राग हळूहळू बाहेर होतो, तर अनेक जण थेट समोरच्याशी भांडण करायला सुरुवात करतात. पण, ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, आपली जन्मतारीख आणि राशीचा आपल्या स्वभावावरही परिणाम होत असतो. काही राशींचे लोक स्वभावाने जास्त रागीट असतात आणि तणाव, परिस्थितीत बघून सहजपणे राग व्यक्त करून मोकळे होतात.
तर आज आपण या बातमीतून कोणत्या राशी स्वभावाने सर्वात जास्त रागीट असतात; त्याचबरोबर सतत रागावण्यामागचे कारण , त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय करता येतात याबद्दलही जाणून घेऊयात…
१. मेष
मेष राशीचे लोक एनर्जेटिक (उत्साही) असतात. पण, कधीकधी स्वतःचे ध्येय पूर्ण झाले नाही म्हणून रागावतात. जेव्हा गोष्टी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत तेव्हा त्यांना लगेच राग येतो.
राग कोणत्या कारणांवरून येतो ?
लगेच एखाद्याला उत्तर देणे.
छोट्याछोट्या गोष्टींचा राग येणे.
दुसऱ्याचा दृष्टिकोण समजण्यास वेळ लागणे.
उपाय –
दीर्घ श्वास घ्या.
ध्यान किंवा योगा करा.
तुमच्या उत्साही स्वभावाचा योग्य कामात उपयोग करा.
२. सिंह
सिंह राशीचे लोक आत्मविश्वासू असतात. पण, जेव्हा गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा त्यांना राग येतो. त्यांचा राग सहसा अहंकार आणि अभिमानामुळे असतो.
राग पटकन येण्याची कारणे?
दुसऱ्यांची चुकीची वागणूक सहन होत नाही.
पटकन निर्णय घेण्याची सवय.
मित्र-कुटुंबातील लोकांच्या बाबतीत कठोर राहणे.
रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग –
योगासने आणि प्राणायाम करा.
रागात लगेच प्रतिक्रिया देऊ नका.
३. वृश्चिक
वृश्चिक राशीची मंडळी भावनिक असतात आणि खोलवर विचार करतात. जरी ते शांत दिसत असतील तरी जेव्हा कोणी त्यांचा विश्वासघात करतो तेव्हा ते खूप रागावतात.
कोणत्या गोष्टी राग येण्यासाठी ठरतात कारणीभूत –
राग बराच काळ लक्षात ठेवणे.
शांत आणि नियोजनबद्ध प्रतिक्रिया.
इतरांच्या कमकुवतपणा लवकर लक्षात येणे.
रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग:
क्षमा आणि समजूतदारपणा दाखवा.
ध्यान आणि मानसिक शांतीचा सराव करून राग कमी करा.
रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा.
मेष आणि सिंह राशीव्यतिरिक्त कोणत्या राशी आहेत रागिष्ट –
जरी ज्योतिषशास्त्रात मेष, सिंह आणि वृश्चिक राशीचे नाव रागिष्ट असण्याच्या यादीत वर असले तरीही
धनु – उत्साही आणि स्वतंत्र स्वभावामुळे त्यांनाही राग येतो.
मिथुन – कधीकधी बदलत्या मूड आणि अस्वस्थतेमुळे पटकन रागावतात.
कर्क – भावनिक असल्याने कुटुंब आणि मित्रांवर त्यांचा राग निघतो.
रागाची कारणे आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोन –
ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की, ग्रहांची स्थिती आणि जन्मकुंडलीचा आपल्या स्वभावावर परिणाम होतो.
उदाहरणार्थ:
मंगळ – राग आणि उर्जेसाठी मंगळ ग्रह जबाबदार आहे. त्याचा प्रभाव मेष आणि सिंह राशीवर अधिक दिसून येतो.
शनि – संतुलन राखण्यास मदत करतो. पण, त्याची अस्थिर स्थिती राग आणि तणाव वाढवू शकते.
म्हणून, काही राशींची मंडळी लवकर रागावतात आणि रागात वेळ वाया घालवतात.
रागावर नियंत्रण ठेवण्याचे मार्ग
ध्यान आणि योग – दररोज १५ ते २० मिनिटे ध्यान आणि योग केल्याने मानसिक शांती वाढते.
सकारात्मक विचार – नकारात्मक परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
दीर्घ श्वास – रागात लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी, दीर्घ श्वास घ्या आणि शांत रहा.
सकारात्मक ऊर्जा – तुमच्या आजूबाजूला सकारात्मक लोकांचे वातावरण तयार करा.
संयम आणि संयम – कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्या.