Saturn-Mercury Conjunction: ज्योतिषशास्त्रात नवग्रहातील शनीला सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते. शनी एकमेव असा ग्रह आहे ज्याला जवळपास एका राशीत पुन्हा प्रवेश करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागतो. तसेच एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार बुध सध्या कन्या राशीत विराजमान असून शनी आपल्या मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये उपस्थित आहे. १८ सप्टेंबर रोजी हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून १८० डिग्रीवर उपस्थित आहेत. शनी आणि बुधाच्या समोरासमोर येण्याने काही राशींच्या व्यक्तींचा जबरदस्त फायदा होईल.

शनी-बुध ग्रहाचा संयोग ‘या’ तीन राशींसाठी फायदेशीर

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी बुध आणि शनीचा संयोग खूप लाभदायी सिद्ध होईल. या राशीत बुध पाचव्या घरात असून शनी अकराव्या घरात भ्रमण करत आहे. हा काळ आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. या काळात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात वाढ होईल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शनी आणि बुधाचे एकमेकांसमोर येणे सकारात्मक फळ देणारे असेल. राशीत शनी पाचव्या आणि बुध अकराव्या घरात विराजमान आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. भौतिक सुखात वाढ होईल. नवीन गोष्टी शिकण्यास प्राधान्य द्याल. कर्ज फेडण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल.

हेही वाचा: सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

कुंभ

कुंभ राशीत शनी लग्न भावात विराजमान आहे आणि बुध सातव्या घरात विराजमान आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची साथ मिळेल. नवी संधीही मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. नवी नोकरी मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. धार्मिक कार्यात यश मिळेल. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)