ज्येष्ठ विधिज्ञ आणि भारताचे माजी महान्यायवादी सोली सोराबजी यांची निधनवार्ता शुक्रवारी, ३० एप्रिल रोजी आली तेव्हा अनेकांना आठवले असेल ते ‘दि इंडियन एक्स्प्रेस’च्या संपादकीय पानांवर त्यांनी अनेक वर्षे सातत्याने केलेले सडेतोड लिखाण! सोली सोराबजी हे साहजिकच अनेक पुस्तकांचेही लेखक होते आणि ही पुस्तके त्यांच्या नैमित्तिक लिखाणापेक्षा निराळी होती. उदाहरणार्थ, त्यांना ज्येष्ठ असलेले दिवंगत विधिज्ञ नानी पालखीवाला यांच्याविषयी त्यांनी लिहिलेले पुस्तक किंवा ‘गव्हर्नर : सेज ऑर सॅबोटिअर?’ हे १९८५ सालचे त्यांचे गाजलेले पुस्तक. पण सोली सोराबजी हेच एका पुस्तकाचा विषय ठरले होते! हे पुस्तक अगदी अलीकडे, नऊ मार्च रोजी त्यांच्या ९१व्या जन्मदिनी समारंभपूर्वक प्रकाशित झाले. ‘डाउन मेमरी लेन’ हे सोराबजी यांच्या या गौरवग्रंथाचे नाव. त्यात माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा, विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमण, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांच्यापासून ते हरीष साळवे, अरविंद दातार आदी २५ हून अधिक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांचे लेख आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2021 रोजी प्रकाशित
सोराबजीगौरव…
सोली सोराबजी हे साहजिकच अनेक पुस्तकांचेही लेखक होते आणि ही पुस्तके त्यांच्या नैमित्तिक लिखाणापेक्षा निराळी होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 01-05-2021 at 00:00 IST
मराठीतील सर्व बुकमार्क बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on down memory lane book by soli sorabjee abn