News Flash

अभ्यास करायचा म्हणत १४ वर्षीय मुलाने घेतला गळफास

आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

प्रतिकात्मक छायाचित्र

इंग्लीश मिडीयम मधे इयत्ता ८ वी मधे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने शनिवारी दुपारी ३ वा. मोबाईल चार्जरने घर आतून बंद करुन गळफास घेतला. या प्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हर्सूल परिसरातील मयूरपार्क भगतसिंग नगर येथे राहणार्‍या प्रद्युम्न राजू हिवाळे(१४) याने घरी एकटा असतांना गळफास घेतला. ही घटना घडली त्यावेळेस वडिल कामावर गेले होते. आई देवदर्शनासाठी खुल्ताबादला गेली होती. तर मोठा भाऊ ट्यूशनसाठी गेला होता.

आईने माझ्या सोबत देवदर्शनाला येण्याचा आग्रह केला होता. पण प्रद्युम्न ने खूप अभ्यास असल्याचे कारंण देत जाणे टाळले.प्रद्युम्न चा मृतदेह घराचे दार तोडून काढावा लागला,प्रद्युम्न च्या आत्महत्येने हर्सूल परिसरात खळबळ उडाली आहे.आत्महत्येचे कारंण अस्पष्ट असून पोलिस निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तायडे पुढीलतपास करंत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2018 11:19 pm

Web Title: 14 year old boy suicide
Next Stories
1 औरंगाबाद मनपाच्या श्वान पथकांनी ५५० मोकाट कुत्रे पकडले
2 मतदारांत गैरसमज पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा नोंदवणार – जिल्हाधिकारी
3 पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित योजना मार्गी लावा
Just Now!
X