24 January 2020

News Flash

७७८ पैकी ४७४ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे.

मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यांत दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: बिघडले आहे. पसेवारी जाहीर होऊनही आíथक मदतीबाबत कोणतीही हालचाल शासकीय पातळीवर होताना दिसत नाही. दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकत्रे मराठवाडय़ातील छोटय़ा-मोठय़ा गावांत जाऊन समस्या समजावून घेत आहेत. दुसरीकडे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही. कर्जबाजारीपणा व नापिकीच्या कारणातून तब्बल ४७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र असल्याची प्रशासकीय माहिती प्रशासनासमोर आहे. तब्बल १४३ आत्महत्यांच्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे.
बीडमध्ये सर्वाधिक १३२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापाठोपाठ उस्मानाबाद व लातूरचा क्रमांक लागतो. या जिल्ह्यांत दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचे संकट काही अंशाने कमी झाले असले, तरी झालेले नुकसान अधिक आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत अजून कोणतीच हालचाल सुरू नाही. अंतिम पसवारीनंतर केंद्राकडे मदत मागितली, तर त्याचे पथक दुष्काळ पाहणीस येते. त्याबाबत निवदेन सरकारला सादर करावे लागते. मात्र, ते अजूनही तयार नाही. त्यामुळे मदत केव्हा आणि कधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर दिले जात नाही.
दरम्यान, मृत्यूला जवळ करणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना मदत देण्यासाठी अनेक हात पुढे येत आहेत. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्यानंतर सचिन खेडेकर आदी कलाकार पुढे येत आहेत. त्यांना मदत करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. मात्र, आत्महत्यांचे सत्र थांबत नसल्याचेच चित्र आहे. मराठवाडय़ात आत्तापर्यंत ७७८ आत्महत्यांपकी ४७४ आत्महत्या शेतीच्या कारणातून झाल्या. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदतही करण्यात आली. एका बाजूने मदत सुरू असताना आत्महत्यांचे सत्र अजूनही थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

First Published on October 8, 2015 1:20 am

Web Title: 778 out of 474 eligible farmers for suicide help
टॅग Farmers,Help
Next Stories
1 ‘‘दादरी’सारखे प्रकरण घडवून अराजकता पसरविण्याचा डाव’
2 गोष्ट काब्देंच्या उमेदवारीची अन् चव्हाणांच्या पराभवाची!
3 ‘फडणवीस सरकारकडे दुष्काळासाठी पैसे नसल्यास त्यांनी तसे जाहीर करावे’!
Just Now!
X