News Flash

वडिलांचा खून करून मृतदेह घरातच पुरला

कन्नड तालुक्यातील जामडी येथील घटना

(संग्रहित छायाचित्र)

दारू पिऊन मारहाण करणाऱ्या वडिलांचा दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने खून करून दीड महिन्यापूर्वी त्यांचा मृतदेह घरातच पुरून ठेवल्याचा प्रकार कन्नड तालुक्यातील जामडी येथे घडल्याचे शनिवारी समोर आले.

कन्नड तालुक्यातील जामडी वनक्षेत्राच्या परिसरात नामदेव पोमा चव्हाण हे आपल्या पत्नी व मुला बाळासह राहात होते. डिसेंबर महिन्यात नामदेव चव्हाण यांचा मुलगा रितेश नामदेव चव्हाण यांच्यात भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून वडिलांच्या डोक्यात काठी मारून त्यांना जखमी केले. मात्र, त्यानंतर त्याने फाशी दिली.

वडिलांच्या मूत्यूची माहिती बाहेर येऊ नये म्हणून घरातच खड्डा करून त्याने मृतदेह पुरला. नामदेव चव्हाण हरविले असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्याचा तपास सुरू असताना मृत चव्हाण यांच्या भावाने पुतण्याकडे चौकशी केली असता त्याने खून केल्याचे मान्य केले. त्यानंतर पोलिसांनी आज घरातील खड्डय़ातून मृतदेह बाहेर काढला. तो उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.  पोलीस निरीक्षक सुनील नेवसे, नायब तहसीलदार हारुण शेख, ग्रामसेवक कल्याण पवार यांच्या उपस्थितीमध्ये मृतदेह काढण्याचे काम शनिवारी करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 1:43 am

Web Title: body was buried in the house by murder abn 97
Next Stories
1 दुचाकीच्या धडकेत महिला ठार
2 हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी भाजप-मनसे सरसावली
3 नामकरणाच्या मुद्दय़ावरून भाजपकडून निषेधासाठी काळे शर्ट
Just Now!
X