11 December 2017

News Flash

पैठण तालुक्यात अंगावर वीज पडून कामगाराचा मृत्यू

येळगंगा नदीच्या पुलावर ही घटना घडली.

औरंगाबाद | Updated: October 7, 2017 7:37 PM

परमेश्वर दशरथ शेरे

पैठण तालुक्यातील ढाकेफळ गावात अंगावर वीज कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला. शनिवारी ढाकेफळ येथील येळगंगा नदीवरील पुलावर ही दुर्घटना घडली. यात परमेश्वर दशरथ शेरे (वय ३६ कंरजखेड ता. पैठण) या कामगाराने आपला जीव गमावला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परमेश्वर शेरे हा कामासाठी ढाकेफळ या गावी कुटुंबियांसह राहत होता. दुपारी दोनच्या सुमारास ढाकेफळ गावालगतच्या येळगंगा नदी पुलावरून जात असताना वीज अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर पायघन यांनी घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

वीज पडल्यानं टीव्ही जळाले?

औरंगाबादसह परिसरात मेघगर्जनेसह पाऊस झाला. यात पहाडसिंगपुरा भागातील अनेक नागरिकांच्या घरातील टीव्ही संच जळाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.विजेच्या खांबावर वीज पडून शॉर्ट सर्किटमुळे टीव्ही जळाले असावेत, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या ‘बीबी का मकबरा’ शेजारी असलेल्या पहाडसिंगपुरा भागात पावसानंतर अचानक मोठा आवाज झाला. परिसरातील विजेच्या खांबावर लख्ख प्रकाश पडला. त्यानंतर परिसरातील तीन घरामधील टीव्ही जळाले. घटनेची माहिती मिळताच वीजवितरण कंपनीचे कर्मचारीही तात्काळ घटनास्थळी हजर झाले. या ठिकाणी कोणतीही जिवीत हानी घडलेली नाही.

First Published on October 7, 2017 7:34 pm

Web Title: death due to lightning in paithan taluka