दुष्काळ जाहीर करूनही सरकारकडून आíथक मदत मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून तो आत्महत्या करीत आहे. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे मेहुणे कैलास बालासाहेब खिस्ते यांनी शुक्रवारच्या रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यात दोन दिवसात पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येमागे नापिकी, कर्जबाजारीपणा व मुलींचे लग्न हिच विवंचना असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोणीकर यांची जिंतूर तालुक्यातील निवळी ही सासरवाडी आहे. त्यांचे मेहुणे कैलास बालासाहेब खिस्ते (वय ४५) हे शेतकरी असून त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळूनच काल शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. राज्यात व जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकरी आíथक विवंचनेमुळे आत्महत्या करीत आहेत. आता मंत्र्यांचे नातेवाईकसुद्धा आत्महत्या करून जीवन संपवित आहेत. या घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून खिस्ते यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी लोणीकर व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.
सेलू तालुक्यातील डासाळा येथील बापूराव लक्ष्मणराव बागल (वय ४०) यांच्यावर बँकेचे कर्ज होते. तसेच एका मुलीचे लग्न जमले. त्यामुळे लग्न कसे करायचे या आíथक विवंचनेतून ते सतत तणावात असायचे. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी घरात कोणी नसताना विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, दोन मुले असा परिवार आहे. याच तालुक्यातील रवळगाव येथील सुभाष काशिनाथ फुलपगारे या तरुण शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. दुष्काळामध्ये कर्ज कसे फिटणार आणि भविष्याची चिंता यामुळे त्यांनी आत्महत्या केली आहे.
मानवत तालुक्यातील मानोली येथील तरुण शेतकरी शिवाजी किशनराव लव्हाळे (वय २८) यांनी िलबाच्या झाडाला गळफास घेऊन शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता आत्महत्या केली आहे. लव्हाळे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी सेलू पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे.
पूर्णा तालुक्यातील िपपळगाव लिखा येथील भानुदास नागोराव कल्लारे (वय ४२) या शेतकऱ्याने गावाच्या शिवारात औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. कल्लारे यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा पूर्णा तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहेत.
जिल्ह्यामध्ये दोन दिवसात तब्बल पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील दोन महिन्यात हे प्रमाण वाढले असून नापिकी, कर्जबाजारीपणा, लग्न अशा वेगवेगळ्या संकटामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत.