06 August 2020

News Flash

केंद्राने योजना गुंडाळल्याने निधी बंद, कामेही थांबली!

संपुआ सरकारने औरंगाबादच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मेगा सíकटच्या माध्यमातून २३ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता.

संपुआ सरकारने औरंगाबादच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी मेगा सíकटच्या माध्यमातून २३ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, केंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर भाजप सरकारने या योजना गुंडाळल्या. परिणामी योजनेचा पुढचा निधी मिळणे बंद झाले आणि अनेक कामेही रखडली. निधीपकी ४ कोटी ६० लाख रुपयांचा पहिला हप्ता मिळाला होता. मात्र, पुढचा निधी मिळण्याची शक्यता आता धूसर असल्याचे महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
शहरातील पोलीस आयुक्तालयासमोरील रस्ता दुभाजकाचे काम, रोजबाग यासारखी कामे महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली. आता पुढचा निधी मिळणार की नाही, याची माहिती जिल्हास्तरावर उपलब्ध नाही. दरम्यान, ज्या योजनेतून हा निधी मंजूर करण्यात आला, ती योजनाच गुंडाळली. तसे करताना जुन्या कामांना निधी मिळणार की नाही हे न सांगताच अन्य दोन योजना सुरू करण्यात आल्या. स्वदेश व प्रसाद अशी त्यांची नावे आहेत. मात्र, जुन्या कामांना निधी देण्याचे भाष्य या योजनेत नाही. त्यामुळे पर्यटन विभागातील अधिकाऱ्यांनी केंद्रीय पर्यटन विभागाच्या सचिवांसमोर अडचणींचा पाढा वाचून दाखविला. या योजनेतील काही कामे ठेकेदारांनी पूर्ण केली आहेत. तथापि त्यांना देण्यासाठी पसाच शिल्लक नसल्याने पर्यटन विभाग अडचणीत सापडला आहे.
दरम्यान, औरंगाबादच्या पर्यटन विकासासाठी देण्यात आलेली रक्कम न मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. केंद्र सरकारने अर्धवट कामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांनीही पाठविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2015 1:40 am

Web Title: fund close work stop due to close central government schemes
Next Stories
1 वादाचे ढग निवळले! – रामदास कदम
2 ‘वरची धरणे ‘कॅप्सूल बॉम्ब’ने उडवा’!
3 अशोक चव्हाणांकडून समर्थन आणि टोलाही!
Just Now!
X